शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ची सांगता

By admin | Updated: June 13, 2016 00:10 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : पालक, विद्यार्थ्यांत समाधान; दहावीतील गुणवंतांना ‘लोकमत’ची शाबासकी

सांगली : करिअरविषयक प्रश्नांबाबत अचूक उत्तर देणाऱ्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ची रविवारी विद्यार्थी, पालकांच्या गर्दीत व उत्साहात सांगता झाली. प्रदर्शनातून मिळालेल्या माहितीबद्दल पालक, विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. जिद्द, अभ्यासातील सातत्याच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या गुणवंतांचा खा. संजय पाटील व आ. सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते यावेळी सत्कार करून ‘लोकमत’ने त्यांना शाबासकी दिली. येथील राम मंदिर चौक परिसरातील कच्छी जैन भवनात शुक्रवारपासून सुरू असलेल्या या आगळ्यावेगळ्या आणि विद्यार्थी, पालकांतील करिअरविषयक दिशा स्पष्ट करणाऱ्या प्रदर्शनाचा रविवारी शेवटचा दिवस असल्याने शहरासह जिल्हाभरातून विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली होती. शिक्षण आणि करिअरबाबत एकाच छताखाली माहिती मिळविण्याची शेवटची संधी असल्याने आज सकाळी दहा वाजल्यापासून विद्यार्थी, पालक प्रदर्शनात येऊ लागले. येथील प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरचा कल लक्षात घेऊन आपल्या संस्थेमधील विविध अभ्यासक्रम, त्यांच्या कालावधीसह शुल्काची सविस्तर माहिती देण्यात येत होती. प्रदर्शनाची वेळ संपेपर्यंत विद्यार्थी, पालकांची गर्दी कायम राहिली.प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा खा. संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. शहरासह जिल्ह्यातील विविध भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा या कार्यक्रमात सत्कार झाला. यावेळी बोलताना खा. संजय पाटील म्हणाले की, आजकाल यश मिळविण्यासाठी केवळ गुण आवश्यक नसतात, तर पुढील करिअरसाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ‘लोकमत’ने अशा उपक्रमातून विद्यार्थी व पालकांना एक दिशा निर्माण करून दिली आहे. करिअर घडविताना आपल्या विचारांपेक्षा आपल्या आई-वडिलांच्या विचारांना प्राधान्य दिले पाहिजे. कारण आई-वडीलच मुलांच्या आयुष्याबाबत योग्य निर्णय घेत असतात. सध्या चांगल्या दर्जाच्या संस्था आपल्या भागातही कार्यरत असून, पालकांनी योग्य निर्णय घेऊन मुलांसाठी प्रवेश घ्यावा. स्पर्धात्मक परीक्षांसाठी जिल्ह्यात चांगले वातावरण असून युपीएससी परीक्षेसाठी एक दर्जेदार मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आ. सुधीर गाडगीळ म्हणाले की, आपल्या मुलांनी आयुष्यात काय करावे, यासाठी पालकांनी अजिबात अट्टाहास करता कामा नये. मुलांना त्यांचे करिअर निवडताना पूर्ण मुभा देणे आवश्यक आहे. त्यांच्या आवडीनुसार जर करिअर निवडले गेले, तर मुले यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक असते. मुलांनी आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, याचा ठोस निर्णय घ्यावा. हा निर्णयच त्यांचे करिअर घडवितो. सांगलीत दर्जेदार युपीएससी मार्गदर्शन केंद्राची गरज असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रदर्शनानिमित्त आयोजित विविध सत्रांमध्ये रविवारी ‘इंजिनिअरिंगमधील करिअर’ या विषयावर प्रा. निखिल पारसनीस यांनी, तर ‘पदवी करत युपीएससी, एमपीएससीची तयारी कशी करावी?’ या विषयावर युनिक अ‍ॅकॅडमीचे शशिकांत बोरालकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाबरोबरच सायन्स पंडित व पिओ बॅँक प्रोबेशनरी आॅफिसर स्पर्धेचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)