शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आशा, गटप्रवर्तकांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन २१ हजार रुपये द्यावेत, आशा व गटप्रवर्तकांचे पाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन २१ हजार रुपये द्यावेत, आशा व गटप्रवर्तकांचे पाच महिन्यांचे थकीत मानधन त्वरित मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील आशा, गटप्रवर्तक महिलांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. तसेच शासनाने मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आशा, गतप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांना दिले. या आंदोलनात सुमन पुजारी, विद्या पाटील, इंदुताई यलमर, विद्या कांबळे, चांदणी साळुंखे, उज्ज्वला गुरव, सुनीता कुंभार, सोनम कोळी, वनिता हिप्परकर, ज्योतीताई निचळ, मोनिका अर्जुन, सविता देवकर, सविता पाटील, सीमा टोमके, नदिरा काझी, मनीषा कदम, सुवर्णा निकम आदी सहभागी झाले होते.

निवेदनात म्हटले की, तातडीने पाच महिन्यांचे थकीत मानधन त्वरित मिळाला पाहिजे, आरोग्य वर्धिनीची रक्कमही अद्याप मिळाली नाही, तीही लवकर मिळावी, कोरोनाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन २१ हजार रुपये मिळाले पाहिजे, यासह विविध मागण्यासाठी आशा, गटप्रवर्तक महिलांनी जिल्हा परिषदेवर मोर्चात काढून निदर्शने केली.