शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील तीन रुग्णालयात ७५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST

इस्लामपूर : शहरासह लगतच्या गावातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखतानाच नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना तातडीचे उपचार मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ...

इस्लामपूर : शहरासह लगतच्या गावातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखतानाच नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना तातडीचे उपचार मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील आणखी तीन रुग्णालये कोरोना उपचारासाठी अधिगृहित केल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी दिली.

दत्त टेकडी परिसरातील समाजकल्याण विभागाच्या इमारत परिसरात सहारा कोविड सेंटरमध्ये एकूण ३० ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले असून त्यातील ५ बेड अतिदक्षता विभागासाठी राखीव असतील. कामेरी रस्त्यावरील श्री हॉस्पिटलमध्ये १० ऑक्सिजन बेड आणि ५ बेड अतिदक्षता विभागासाठी तर सत्रे-देशमुख रुग्णालयात ३० बेड असून त्यातील १५ बेड ऑक्सिजनचे आणि ६ बेडचा अतिदक्षता विभाग असणार आहे.

डॉ. पाटील म्हणाले, ७५ बेडची नव्याने व्यवस्था झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्याची सुविधा निर्माण झाली आहे. यापूर्वी तालुक्यामध्ये ५१६ बेडची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील मुस्लिम समाजाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड उपचार केंद्रात ७० बेड आहेत. या सर्व ठिकाणी कोविड रुग्णांना गतीने उपचार मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.