शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन कोटींच्या रस्ते कामास मंजुरी

By admin | Updated: August 24, 2014 23:16 IST

इस्लामपूर पालिका सभा : सात रस्त्यांची कामे होणार

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेला शासनाकडून रस्ते विकासासाठी मिळालेल्या अनुदानातून करावयाच्या सात रस्त्यांच्या कामांना आज (रविवारी) झालेल्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष संजय कोरे, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा पार पडली. या सभेमध्ये केवळ रस्ते कामाचा विषय होता. ई निविदा पध्दतीने या रस्ते कामासाठी आॅनलाईन निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अंदाजपत्रकापेक्षा ११, ८ व ७ टक्के जादा दराच्या निविदा आल्या होत्या.सभागृहात अभियंता शाम खटावकर यांनी या निविदांची माहिती देतानाच युनिटी बिल्डर्स, कऱ्हाड यांनी ५ टक्के दराने काम करण्याची तयारी दर्शविल्याचे पत्र वाचून दाखवले.त्यामुळे सभागृहाला अंधारात ठेवून प्रशासनाकडूनच सर्व सूत्रे हलविली जात असल्याबद्दल नगरसेवक खंडेराव जाधव, बी. ए. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. संजय कोरे यांनी, सभागृहात चर्चा न होता झालेली ही कार्यवाही म्हणजे निगोसिएशन समजायचे का? असा प्रश्न उपस्थित केला.बी. ए. पाटील यांनी, ज्या ठेकेदाराला हे काम दिले जाणार आहे, त्यांची पात्रता, अनुभव आणि आर्थिक विवरणाची माहिती घ्यावी. तीनही ठेकेदारांशी चर्चा करुन जो कमी रकमेत काम करण्यास मान्यता देईल, त्याला हे काम द्यावे, अशी सूचना केली. (वार्ताहर)पत्रवाचनानंतर सभागृह अवाकइस्लामपूर शहरातील सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चाच्या सात रस्त्यांच्या कामासाठी कऱ्हाड (जि. सातारा) येथून तीन निविदा आल्या. त्यातील अंदाजपत्रकापेक्षा सात टक्के जादा दराने आलेली निविदा मंजूर करण्यापूर्वीच बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी हा ठेकेदार आणखी २ टक्के कमी दराने काम करण्यास तयार असल्याचे पत्र वाचून दाखवल्यावर अवघे सभागृहचअवाक् झाले.