शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत रिक्षांवर कारवाईचा बडगा!

By admin | Updated: November 1, 2015 23:54 IST

प्रचंड नाराजी : रस्त्यावरून रिक्षा गायब; दंडाची रक्कम भरणे अशक्य

सचिन लाड ल्ल सांगली नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध गेल्या चार दिवसांपासून आरटीओ कार्यालयाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पण ऐन दिवाळीत कारवाई सुरू केल्याने चालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. कारवाईपोटी सात ते आठ हजार रुपये दंड होत आहे. एवढा दंड भरणे चालकांना परवडत नसल्याने त्यांनी रिक्षा फिरविणे बंद केले आहे. शहरातील अनेक थांब्यांवर दररोज २० ते २५ रिक्षा लागायच्या. मात्र कारवाईच्या भीतीने पाच ते सातच रिक्षा लागत आहे. दिवाळीचा सण असल्याने आरटीओंनी ही कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणी होत आहे. मुदत ओलांडून गेलेले जिल्ह्यात अडीच हजार परवाने आहेत. हे परवाने नूतनीकरण करण्यासाठी परिवहन आयुक्तांनी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. पण तरीही रिक्षाचालक नूतनीकरणास तयार नाहीत. त्यामुळे हे परवाने रद्द होत असल्याने आरटीओ कार्यालयाने सरसकट रिक्षाची तपासणी सुरूकेली आहे. परवाने नूतनीकरणाच्या अनुषंगाने तपासणी करायची होती. परंतु यामध्ये सर्वच रिक्षाचालक भरडले जात आहेत. गेल्या चार दिवसांत तब्बल सव्वाशे रिक्षांवर कारवाई केली. यातील पन्नास रिक्षा जप्त केल्या आहेत. सणासुदीच्या काळात या रिक्षा बाहेर काढणे अशक्य आहे. दंडाची रक्कम दहा हजाराच्या घरात जात आहे. सण साजरा करण्यास १५ ते १६ तास व्यवसाय करून पैसे मिळविण्याची धडपड सुरू असताना अचानक ही कारवाई सुरू झाल्याने रिक्षाचालक मेटाकुटीस आला असल्याचे चित्र आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय यापूर्वीच आर्थिक संकटात सापडला आहे. दिवसभरात शंभर-दोनशे रुपये हजेरी पाडणे मुश्किल बनले आहे. संघटना आरटीओंना आज भेटणार आरटीओंनी सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक कृती समिती रिक्षा संघटनेची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत कारवाईस आमचा विरोध नाही. पण सणासुदीच्या काळात ही कारवाई बंद करावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात सोमवारी आरटीओ दशरथ वाघुले यांना भेटून कारवाई थांबविण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस जिल्हाध्यक्ष गजानन बाबर, शहर अध्यक्ष रामभाऊ पाटील, फिरोज मुल्ला, शेखर शिंदे, राजू रसाळ, बबलू पाटील, नईम हकीम, प्रशांत सरडे, दीपक दळवी, सलीम ठाकूर आदी उपस्थित होते. दंडाची रक्कम भरण्यास रिक्षा चालकांकडे पैसे नाहीत. सावकार अथवा भिशीमधून त्यांना पैसे काढावे लागत आहेत. एकीकडे कारवाई होत आहे. दुसरीकडे रिक्षा बंद ठेवावी लागत आहे. शिवाय दंडाच्या रकमेसाठी पैशाची जुळणी करण्यास भटकावे लागत आहे. - रामभाऊ पाटील, शहर अध्यक्ष, प्रवासी वाहतूक कृती समिती