शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

सत्ताधारी-विरोधकांत रंगला कलगीतुरा

By admin | Updated: August 26, 2015 23:09 IST

इस्लामपूर नगरपालिका : विरोधकांनी १४ हजारात खोके द्यावे : शहाजी पाटील

अशोक पाटील- इस्लामपूरशहरातील जुनी खोकी काढून चार बाय पाच फूट आकाराची नवीन खोकी बसविण्यासाठी इस्लामपूर पालिका २२ हजार रुपये आकारत आहे. याविरोधात विरोधी पक्षनेते विजय कुंभार आणि शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार यांनी आवाज उठवला आहे. पालिकेने जादा दर लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक शहाजी पाटील यांनी, विरोधकांनी १४ हजारात खोकी उपलब्ध करून द्यावीत, असा पलटवार केला आहे.शहरातील बसस्थानक परिसर आणि जुना बहे नाका येथे पालिकेच्यावतीने जुनी आणि वेगवेगळ्या आकाराची असलेली खोकी काढून तेथे चार बाय पाच फूट आकाराची खोकी बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे बाजारादिवशी होणारी वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. परंतु विरोधकांनी मात्र ही खोकी जास्त दराने दिल्याचा व कोणताही ठराव न करता बेकायदेशीरपणे ही खोकी बसविण्याचा उद्योग सुरू केल्याचा आरोप केला आहे.विजय कुंभार आणि आनंदराव पवार या विरोधकांनी, ही खोकी दहा ते १४ हजारात मिळत असून, पालिकेने जादा पैसे घेऊन ते खिशात घातल्याचा आरोप केला आहे.याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले की, पूर्वीची लाकडी, पत्र्याची खोकी काढून चांगल्या दर्जाची पत्र्याची खोकी देण्यात आली आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. विरोधक विजय कुंभार यांनी, सत्ताधाऱ्यांनी केलेल्या प्रत्येक कामात चुका काढण्याचा उद्योग सुरू केला आहे. पालिकेची अनेक विकासकामे व अंतर्गत कामांबाबात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्याप एकाही तक्रारीची तड लागलेली नाही. असे उद्योग कुंभार यांनी बंद करावेत. आम्ही शहराचा विकास करण्यासाठी खंबीर आहोत. आनंदराव पवार यांनी, ही खोकी १० हजार रुपयांना मिळतात, असा आरोप केला आहे. त्यामुळे या दोघांनाही माझे खुले आव्हान आहे. १० ते १४ हजारात खोके मिळत असेल, तर शहरातील सर्व खोक्यांचे पैसे मी देतो, ही खोकी त्यांनी बसवून दाखवावीत!नवीन खोकी बसविण्यासंदर्भात पालिकेच्या सभेत ठराव करण्यात आला आहे, परंतु सभेला अनुपस्थित राहणाऱ्या विरोधकांना याची माहिती कशी असणार?, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खोकी बसविण्यावरून कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत इस्लामपूर बसस्थानक परिसर आणि जुना बहे नाका येथे पालिकेच्यावतीने जुनी आणि वेगवेगळ्या आकाराची असलेली खोकी काढून तेथे चार बाय पाच फूट आकाराची खोकी बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे बाजारादिवशी होणारी वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. विरोधकांनी ठराव न करता बेकायदेशीरपणे ही खोकी बसविण्याचा उद्योग सुरू केल्याचा आरोप केला आहे.विरोधी पक्षनेते आता शहरातील कोणत्याही विकास कामावर मत व्यक्त करू लागले आहेत. ज्याप्रमाणे आम्ही हिमतीवर जलदगतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला, त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभिकरणाचे कामही पूर्ण करणार आहे. या कामांमध्ये विरोधकांचे कसलेही योगदान नसून, त्यांनी कोल्हेकुई बंद करावी.- विजयभाऊ पाटील, पक्षप्रतोद