शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

कमी बसफेऱ्यांचा प्रवाशांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST

इस्लामपूर : कोरोना महामारीत एसटी बसेसचे वेळापत्रक ढासळले आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात सांगलीवरून आष्टा- इस्लामपूर- कराडकडे जाणाऱ्या बसेससाठी प्रवाशांना ...

इस्लामपूर : कोरोना महामारीत एसटी बसेसचे वेळापत्रक ढासळले आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात सांगलीवरून आष्टा- इस्लामपूर- कराडकडे जाणाऱ्या बसेससाठी प्रवाशांना तासन्तास तिष्ठत बसावे लागत आहे. सकाळ प्रहरी तुंग येथील बसथांब्यावर एक महिला कारनंदवाडी येथे जाणार होती. या महिलेस बससाठी दीड ते दोन तास थांबावे लागले. त्यामुळे ती संतप्त होऊन चालत गेले असते तर गाव गाठले असतं असे प्रत्येकाला सांगत होती.

जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दोनशेच्या घरात आला आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रातील व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. काही विद्यालये व महाविद्यालये सुरू झाली आहेत. शासकीय कर्यालयांत, बँका, खासगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढत आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळाने स्थानिक बसफेऱ्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.

आष्टा परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, कामगार इस्लामपूर, सांगली येथे जातात. सांगलीवरून पुणेकडे जाणाऱ्या सर्व बसेस तुंग येथे थांबत नाहीत. त्यातच स्थानिक गाड्या कमी संख्येने धावतात. त्यामुळे तुंग, बवची आणि इतर थांब्यांवर बसची वाट पाहत तासन्तास थांबावे लागत आहे.

शनिवारी चटई विक्री करणारी महिला बसची वाट पाहत होती. सकाळी सात वाजेपासून ते साडेआठ वाजेपर्यंत कारनंदवाडी येथे जाण्यासाठी तिला बस मिळाली नाही. तिने राज्य परिवहनबद्दल संतापाने उद्गार काढले.