शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

३५ सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या जाहीर

By admin | Updated: December 28, 2015 00:26 IST

जानेवारीत मतदान : जिल्हा सहकार बोर्डाचाही समावेश

सांगली : डिसेंबरअखेर निवडणुकीस पात्र असणाऱ्या जिल्ह्यातील ३५ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या निवडणुकांमध्ये जिल्हा सहकारी बोर्डासह ब गटातील अन्य महत्त्वाच्या संस्थांचा समावेश आहे. संचालक मंडळाच्या २०१५-१६ ते २०१९-२० या पंचवार्षिक कालावधीसाठी या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. २८ डिसेंबर २०१५ ते २ फेब्रुवारी २०१६ पर्यंत या सर्व निवडणुका घेतल्या जात आहेत. या सर्व निवडणुका ब गटातील सहकारी संस्थांच्या आहेत. यातील बहुतांश संस्थांसाठी २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधित मतदान घेऊन त्या-त्या दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. जिल्हा सहकारी बोर्डाच्या १९ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील सहकारी संस्थांचा प्रत्येकी १ याप्रमाणे १० सदस्य, जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या संस्थेचा १ प्रतिनिधी, व्यक्तिगत सभासद प्रतिनिधी २, आजीव सभासद प्रतिनिधी १, महिलांसाठी राखीव प्रतिनिधी २, अनुसूचित जाती, जमाती प्रतिनिधी १, विमुक्त भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गासाठी १ आणि इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून १ अशा १९ जागांचा समावेश आहे. सहकार बोर्डासाठी सहायक निबंधक अमित गराडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २८ डिसेंबर ते १ जानेवारी २०१३ पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. २ जानेवारीस दाखल अर्जांची छाननी केली जाणार असून, ४ जानेवारीस वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ४ ते १८ जानेवारी या कालावधित उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. १९ जानेवारीस चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यानंतर थेट ३१ जानेवारीस मतदान होणार आहे. त्याचदिवशी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. जिल्हा सहकारी बोर्ड ही एक महत्त्वाची संस्था असून, या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती, पगारदार, सेवक पतसंस्था व औद्योगिक सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे त्या-त्या गावात आणि तालुक्यात आता पुन्हा पक्षीय स्तरावर वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. (प्रतिनिधी)