शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

अनिलभाऊ, कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे उंबरठे अंधारात का झिजवताय?

By admin | Updated: June 24, 2016 00:49 IST

वैभव पाटील : आमदारांवर टीका; आम्ही जनतेला न्याय देतो

विटा : खानापूर मतदारसंघात विद्यमान आमदारांकडून न्याय मिळत नसल्याने लोक आमच्याकडे येत आहेत. आम्ही पक्ष न पाहता खासदारांच्या माध्यमातून शासनदरबारी जाऊन न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुम्ही एवढे कार्यतत्पर असल्याचे ऊर बडवून सांगताय, मग तालुक्यात लोक आमच्याकडे का येतात? तुम्ही कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या घराचे उंबरठे अंधारात का झिजवताय, असा प्रतिटोला नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना गुरुवारी पत्रकार परिषदेत लगावला. नगराध्यक्ष पाटील म्हणाले की, आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून आमदार विट्यात फंड खर्च करीत आहेत. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी बहुतांशी आमदार फंड दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये खर्च केला होता. मात्र दोन्ही तालुक्यांना न्याय देण्याऐवजी सध्याचे आमदार नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विटा शहरात फंड खर्च करतात. टेंभूसाठी शासनाकडून कोणी किती निधी मिळविला, हे जनतेला माहिती आहे. आतापर्यंत टेंभूसाठी विद्यमान आमदारांनी बारा वर्षांत तीनशे कोटी, तर सदाशिवराव पाटील यांनी दहा वर्षात अकराशे एक कोटीचा निधी मिळविला आहे. विटा पारिसरातील शेतकऱ्यांचा कळवळा आताच का तुम्हाला आला आहे? एवढा कळवळा होता, तर कालच्या दुष्काळी परिस्थितीत तुम्ही काय केले ते जनतेला सांगावे. मतदारसंघात जनावरांसाठी एकही चारा छावणी तुम्ही सुरू करू शकला नाही. दहशत व धमक्यांची विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जुनी व गुळगुळीत झालेली टेप बंद करावी. लोक एकदा फसतात, वारंवार फसतील एवढे लोकांना दूधखुळे समजू नका. गुंडगिरी कोण करते, हे समजण्यासाठी तुम्ही कोणत्या पक्षाचा आधार घेतला आहे, एवढे बघितले तरी पुरे आहे, अशी टीका नगराध्यक्ष पाटील यांनी केली. (वार्ताहर)कामाचा निधी वळवणे हा खुजेपणाच...विटा नगरपालिकेला ८ मार्च रोजी दीड कोटींचे रस्ते अनुदान मिळाले होते. त्यापैकी एक कोटींचे विशेष रस्ते अनुदान होते. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. खासदार संजय पाटील यांनी शिफारस केली होती. त्यानंतर २८ मार्चला हा एक कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्याचा आदेश आला. कॉँग्रेसच्या नेत्यांना निधी देताय, असे सांगून आमदारांनी निधी वळवण्यास सांगितले. त्यानंतर मी आणि खासदार पाटील मुख्यमंत्र्यांना भेटलो. १६ मे रोजी विट्याची कार्यान्वित यंत्रणा बदलून नगरपालिका ही कामे करणार असल्याबाबतचा आदेश निघाला. त्यानुसार प्रस्ताव दाखल करण्यात आले. मात्र आमदारांनी उध्दव ठाकरे यांना भेटून मुख्यमंत्र्यांना फोन करण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा कार्यान्वित यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग करण्यात आल्याने हा निधी तिकडे वर्ग झाला. आम्ही प्रयत्न केलेल्या कामाचा निधी यंत्रणा बदलून वळवणे हा खुजेपणा आहे, अशी टीका पाटील यांनी केली.