शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांवरील गुन्ह्यांमुळे संताप

By admin | Updated: January 26, 2015 00:36 IST

कारवाईबद्दल नाराजी : परप्रांतीय कामगारांची माहिती न दिल्याचे प्रकरण

सांगली : परप्रांतीय कामगारांची माहिती न दिल्याप्रकरणी दोन उद्योजकांवर कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे कुपवाड, मिरज एमआयडीसीमधील उद्योजकांमधून संताप व्यक्त होत आहे. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे उद्योजकांवर गुन्हे दाखल करण्याची पोलिसांची भूमिका चुकीची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. येत्या दोन दिवसांत याप्रश्नी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांची भेट घेणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले. कामगारांची माहिती न दिल्याप्रकरणी पोलिसांनी रावसाहेब केदारी माळी (तारा इंडस्ट्रीज, मिरज एमआयडीसी), परेश चंपकलाल शहा आणि विपुल चंपकलाल शहा (योगी कार्पोरेशन, एमआयडीसी कुपवाड) यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्याचबरोबर कामगार भाडेकरुंची माहिती न दिलेल्या अकरा घरमालकांवरही गुन्हे दाखल केले आहेत. उद्योजकांवर केलेल्या कारवाईमुळे उद्योजकांमधून संताप व्यक्त होत आहे. गुन्हेगारांप्रमाणे उद्योजकांना पोलिसांनी वागणूक दिल्याची भावना काही उद्योजकांनी व्यक्त केली. पोलिसांनी पन्नास सार्वजनिक ठिकाणी आदेशाच्या प्रती भिंतीवर चिकटविल्या होत्या. याप्रकरणी कुपवाड पोलिसांची विशेष पथकेही तैनात झाली आहेत. घरमालकांनी भाडेकरुंची, तर उद्योजकांनी कामगारांची माहिती द्यावी, अशी सूचना पोलिसांनी दिली होती. प्रत्यक्षात याठिकाणचे औद्योगिक क्षेत्र मोठे आहे. पोलिसांनी एकदा सूचना देऊन लगेच कारवाई केल्यामुळे उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कारवाईप्रकरणी उद्योजकांचे शिष्टमंडळ येत्या दोन दिवसात जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांची भेट घेणार आहे. उद्योजकांना नाहक त्रास देण्यात येऊ नये, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. संघटनेकडूनही सूचनापत्रकऔद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार कामगारांची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी, अशी सूचना सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने स्वतंत्र पत्रकाद्वारे उद्योजकांना दिली आहे. संघटनेच्या कार्यक्षेत्रातील उद्योगांना त्यांनी याबाबत लेखी कळविले आहे. संघटनेकडूनही प्रयत्न सुरू असतानाच पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.