शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आमराईचा श्रमदानातून होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:48 IST

सांगली : तब्बल १७३ वर्षांपूर्वी सांगलीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आमराई उद्यानाचा कायापालट करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे. येत्या ...

सांगली : तब्बल १७३ वर्षांपूर्वी सांगलीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आमराई उद्यानाचा कायापालट करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे. येत्या ४ मे रोजी सकाळी सहा ते नऊ या वेळेत निसर्गप्रेमी कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नव्याने झाडांची लागवड व उद्यानाची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी केले आहे.खेबूडकर म्हणाले की, आमराई उद्यानात मागील काही वर्षात महापालिकेतर्फे काही झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन केले जात आहे. आमराईमधील जागेची उपलब्धता पाहता, त्याठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्याचा मानस आहे. मोठ्या प्रमाणात झाडे असल्याने येथे आॅक्सिजनचे प्रमाण जास्त आहे. उद्यानात सकाळी व सायंकाळी लोक फिरण्यासाठी व व्यायामासाठी येतात. तिथे आॅक्सिजनचे प्रमाण आणखी वाढवून आॅक्सिजन पार्क केल्यास, ते नागरिकांच्या आरोग्याला उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे उद्यानातील रिकाम्या जागी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रिकाम्या जागेत सुशोभिकरणाची झाडे लावल्यास एक सुंदर बगीचा पुन्हा तयार होईल.याकरिता लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. येत्या ४ मे रोजी सकाळी ६ ते ९ या वेळेत श्रमदानातून बाग स्वच्छता व वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेणार आहोत. या उपक्रमात उद्यानात रोज फिरायला येणारे नागरिक, सामाजिक संस्था, युवक, विद्यार्थी व निसर्गप्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.उद्यानाला १७३ वर्षे पूर्णआमराई उद्यान १८४६ मध्ये विकसित करण्यात आले. या उद्यानाला यंदा १७३ वर्षे पूर्ण होत आहेत. १९८५ मध्ये उद्यानातील झाडांची मोजदाद करण्यात आली होती. तेव्हा सव्वाशे जातींचे वृक्ष आमराईत होते. त्यामध्ये चिंच, गोरखचिंच, चंदन, मोहोगनी, टेंभुर्णी, बेलगामवट, केशिया, रिठा, चेंडूफूल, भद्रलता, राचण, खडशिरणी, कदंब, रुद्राक्ष, सोनचाफा, नागचाफा, नागकेशर, पांगारा, शिसम, अशोक अशा अनेक दुर्मिळ जातींच्या वृक्षांचा समावेश होता. पूर्वी आमराईत चंदनाचीही विपुल झाडे होती. कालांतराने हे वृक्ष कमी होत गेले. एक ‘बोटॅनिकल गार्डन’ म्हणून आमराई उद्यान विकसित करण्याइतपत गुणवत्ता या उद्यानात आहे, असे खेबूडकर म्हणाले.