शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

‘चांदोली’बाबत आमच्या सूचनाही विचारात घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:29 IST

शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली अभयारण्यातील जैवविविधतेचा आनंद पर्यटकांना मिळण्याकरिता व येथील पर्यटनाबरोबर रोजगार वाढीसाठी आम्ही लोकप्रतिनिधी ...

शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली अभयारण्यातील जैवविविधतेचा आनंद पर्यटकांना मिळण्याकरिता व येथील पर्यटनाबरोबर रोजगार वाढीसाठी आम्ही लोकप्रतिनिधी असताना सुचविलेले मुद्दे राज्य सरकारने प्राधान्याने विचारात घेऊन चांदोली परिसर व अभयारण्याचा पर्यटनाच्या दृष्टीने लवकरात लवकर विकास करावा, असे मत माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ते म्हणाले, चांदोली परिसरामध्ये असणारी बरीचशी जमीन पाटबंधारे विभागाच्या मालकीची आहे. यामध्ये विशेष करून सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. विविध विभागांना लागणारी जमीन पाटबंधारे विभागाने समन्वयातून प्राप्त परिस्थितीनुसार त्या-त्या विभागाला भाडेकरारानुसार किंवा कायमस्वरूपी द्यावी. चांदोली प्राधिकरण या स्वतंत्र विभागाची निर्मिती करून या परिसरामध्ये मत्स्यालय, सर्पोद्यान, पैठण व म्हैसूरच्या धर्तीवर बगीचा, एमटीडीसीमार्फत पर्यटकांच्या निवासाची व भोजनाची, वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध करावी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पशू, पक्षी, प्राणी, वनस्पती या सर्वांची माहिती होण्याकरिता स्वतंत्र संग्रहालय उभे करावे.

वनविभागाने पर्यटनसंबंधी विशेष बाब म्हणून जलाशयाच्या बाजूने असणारा हा रस्ता उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून पर्यटकांना अभयारण्यात १५ किलोमीटरपर्यंत येथील सृष्टिसौंदर्याचा आनंद घेता येईल, अशी मागणी केली होती. यातील जलाशयाशेजारील जनीच्या आंब्यापासूनचा रिंग रोड आता पूर्ण होत आला आहे.

चाैकट

‘पाटबंधारे’च्या जागा मिळाव्यात

एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयातून विशेष लक्ष घालावे. पाटबंधारे विभागाकडे जमीन उपलब्ध व वापराविना शिल्लक आहे. चांदोली पर्यटनासाठी जागा देऊनही त्यांच्याकडे जमीन शिल्लक राहणार आहे.

महाबळेश्वरपाठोपाठ दक्षिण महाराष्ट्रात पर्यटनासाठी प्रचंड वाव असणारा चांदोली परिसर आहे. यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शिवाजीराव नाईक यांनी केली आहे.