शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या बाराव्याला रोपांचे वाटप

By admin | Updated: April 30, 2017 01:10 IST

स्तुत्य उपक्रम : नागदेववाडीच्या दिवसे कुटुंबीयांचा इतरांसमोर आदर्श

कोल्हापूर : नागदेववाडी (ता. करवीर) येथील संजय गांधी निराधार पेन्शन योजना समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र दिवसे यांनी आईच्या बाराव्या दिवसाच्या विधीनिमित्त पारंपरिक भांडीवाटपाला फाटा देत रोपांचे वाटप केले. दिवसे कुटुंबीयांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. राजेंद्र दिवसे यांच्या आई अर्चना अशोक दिवसे यांचे १८ एप्रिल रोजी निधन झाले. ‘अर्चनावहिनी’ म्हणून त्या साऱ्या गावाला परिचित होत्या. त्यांच्या मनमिळावू, अडचणीतील प्रत्येकासाठी नेहमी मदतीचा हात देणाऱ्या स्वभावामुळे त्यांच्या आकस्मिक जाण्याने साऱ्या गावावर शोककळा पसरली होती. या कुटुंबीयांनी आपल्या स्वभावातून इतका गोतावळा निर्माण केला आहे की, गेले बारा दिवस सांत्वनासाठी अक्षरश: रीघ लागली होती. शनिवारी बाराव्याचा विधी केला. मृताच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून बाराव्या दिवशी पै-पाहुण्यांना भांड्यांचे वाटप करण्याची गावात फार जुनी परंपरा आहे; पण तिला फाटा देत राजेंद्र दिवसे यांनी बाराव्यासाठी येणाऱ्या पै-पाहुण्यांना रोपांचे वाटप करून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. ४०० हून अधिक रोपांचे वाटप करीत असताना त्यांचे जतन करण्याची विनंतीही ते पाहुण्यांना करीत होते. पंचायत समितीचे सदस्य मोहन पाटील यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य योगेश ढेंगे, अशोक दिवसे, पोपट दिवसे, मधुकर दिवसे, जयवंत दिवसे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नागदेववाडी (ता. करवीर) येथील राजेंद्र दिवसे यांनी आईच्या बाराव्यानिमित्त रोपांचे वाटप केले. यावेळी मोहन पाटील, अशोक दिवसे, पोपट दिवसे, मधुकर दिवसे, जयवंत दिवसे उपस्थित होते.