शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या मोर्चास सर्वपक्षीय पाठिंबा

By admin | Updated: September 13, 2016 00:46 IST

पलूसमधील बैठकीत निर्णय : हजारो कार्यकर्ते सहभागी होणार

पलूस : सांगली येथे दि. २७ रोजी आयोजित केलेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये पलूस तालुक्यातून हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार सोमवारी येथे झालेल्या सर्वपक्षीय व सामाजिक कार्यकर्र्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. सांगली येथे २७ सप्टेंबर रोजी आयोजित मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी येथील संग्राम लॉन येथे पलूस तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे विजयसिंह महाडिक यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते पुढे येत आहेत. स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही आघाडीवर आहेत. समन्वयाने नियोजन करून मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी दत्ता उथळे यांनी क्रांती मोर्चाविषयी माहिती दिली. मोर्चामध्ये स्वच्छता, वाहने पार्किंग शिस्त याविषयी संयोजकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. बैठकीत गावनिहाय बैठका घेऊन प्रत्येक गणेशोत्सव मंडळाला तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष भेटून मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्याचे ठरवण्यात आले आहे. अख्तर पिरजादे यांनी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आसल्याचे सांगितले, तर प्रमोद हजारे यांनी मोर्चास धनगर समाजाचा पाठिंबा जाहीर केला. यावेळी जयकर पाटील, नारायण निकम, चेतन जाधव, इंद्रजित पवार, संतोष चव्हाण, विकास पाटील, चंद्रकांत आरबुने, आनंदा भोसले, अमर इनामदार, पोपट मोरे, सतीश पाटील, वैभव पवार, विजय पवार यांची भाषणे झाली. जयकर पाटील यांनी स्वागत केले. बैठकीस तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष ए. डी. पाटील, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद लाड, बापूसाहेब येसुगडे, विश्वास पाटील, संदीप पाटील, भरत इनामदार, झुंझार शिंदे, रणजित यादव, मिलिंद पाटील व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. दत्ता उथळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)