शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

युती-महायुतीत लढत रंगणार

By admin | Updated: July 15, 2015 00:43 IST

विटा बाजार समिती निवडणूक : शिवसेनेच्या जुन्या गटाची रिंगणातून माघार

विटा : खानापूर व कडेगाव तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, कॉँग्रेसच्या मोहनराव कदम गटाच्या युतीविरोधात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक व कॉँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासह रिपाइं, शेतकरी संघटना व समतावादी महासंघ यांच्या महायुतीने दंड थोपटले आहेत. १९ जागांसाठी सहा अपक्षांसह ४५ उमेदवार रिंगणात असले तरी, युती व महायुतीतच खरी लढत आहे. बाजार समितीसाठी ११५ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ७० उमेदवारांनी माघार घेतली. विद्यमान आमदार अनिल बाबर, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, माजी आमदार व भाजप नेते पृथ्वीराज देशमुख यांच्यात युती झाली आहे, तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी माजी आमदार सदाशिवराव पाटील, रिपाइं, शेतकरी संघटना व समतावादी महासंघाला सोबत घेऊन महायुती केली आहे.मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्यादिवशी अ‍ॅड. मुळीक यांच्या महायुतीत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या जुन्या गटाने रिंगणातून माघार घेतली. शिवसेनेचे खानापूर तालुकाप्रमुख संजय विभुते व कडेगाव तालुकाप्रमुख सुभाष मोहिते यांच्या समर्थकांनी अर्ज मागे घेतले. या महायुतीतून अ‍ॅड. मुळीक यांचे सुपुत्र अ‍ॅड. संदीप मुळीक व माजी नगरसेवक सचिन शितोळे मैदानात आहेत.सोसायटी गटातून ७ जागांसाठी १८ अर्ज राहिले आहेत, तर इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती, ग्रामपंचायत गट, अनुसूचित जाती-जमाती, हमाल तोलाईदार व कृषी प्रक्रिया खरेदी-विक्री व्यवसाय गटात एकास एक लढत होत आहे. महिला राखीव गटात दोन जागांसाठी ५, तर व्यापारी गटात २ जागांसाठी ६ उमेदवार आहेत. माजी संचालक नथुराम पवार, सुबराव निकम, सुनील मेटकरी वगळता दोन्ही गटांनी नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. (वार्ताहर)अनिल बाबर टार्गेटशिवसेनेच्या जुन्या गटाला सेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी आ. बाबर यांना प्रसिध्दीपत्रकाव्दारे टार्गेट केले आहे. खानापूर तालुकाप्रमुख संजय विभुते व कडेगाव तालुकाप्रमुख सुभाष मोहिते यांनी प्रसिध्दीपत्रक काढले आहे. आ. बाबर यांनी जुन्या शिवसैनिकांना सोबत घेऊन न जाता भ्रमनिरास केला आहे. जुन्या शिवसैनिकांना सामावून घेण्याबाबत वरिष्ठांकडून संपर्क साधला असता, आ. बाबर यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नवा व जुना गट असा वाद नको म्हणून आम्ही बिनशर्त माघार घेत असून, तटस्थ राहणार असल्याचे विभुते व मोहिते यांनी सांगितले.