शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तांबोळी-शिंदे यांच्यात पुन्हा वाद

By admin | Updated: June 16, 2016 00:56 IST

राष्ट्रवादी कार्यालयात प्रकार : नेत्यांच्या मध्यस्थीनंतर वादाला पूर्णविराम

सांगली : युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी आणि जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस वैभव शिंदे यांच्यात मंगळवारच्या बैठकीत झालेल्या वादाचे पडसाद बुधवारी पुन्हा उमटले. प्रचंड वादावादी झाल्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मध्यस्थीने या वादाला पूर्णविराम मिळाला. सांगलीच्या राष्ट्रवादी कार्यालयात मंगळवारी युवक राष्ट्रवादीची बैठक झाली होती. या बैठकीस युवकचे प्रदेश उपाध्यक्ष शैलेश मोहिते-पाटील निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमक्षच शिंदे व ताजुद्दीन तांबोळी यांनी भाषणातून एकमेकांना टोमणे मारले होते. हाच वाद पुन्हा बुधवारी दुपारी उफाळून आला. बुधवारी सांगलीच्या जिल्हा कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शहराध्यक्ष सागर घोडके, ताजुद्दीन तांबोळी, वैभव शिंदे, सचिव मनोज भिसे एवढे मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते. तांबोळी यांचे आगमन होताच शिंदे यांनी त्यांच्याकडे बोट करीत, ‘तुम्ही मला बोलायचा काय संबंध? जाहीर बैठकीत पुन्हा असे बोलाल तर याद राखा’, अशा शब्दात संताप व्यक्त केला. त्यानंतर तांबोळी यांनीही त्यांना ‘हात खाली करून बोलायचे. वादाची सुरुवात तुम्हीच केली होती. वयाचा विषय काढून तुम्ही डिवचले नसते, तर मलाही बोलण्याचे कारण नव्हते. मान तुम्ही राखला नाही, तर आम्हीसुद्धा राखणार नाही.’ अशा शब्दात प्रत्युत्तर दिले. दोन्ही पदाधिकाऱ्यांचा आवाज वाढत गेला. जवळपास दहा मिनिटे हा वाद अन्य पदाधिकाऱ्यांसमोर सुरू होता. संजय बजाज यांनी मध्यस्थी केली व दोन्ही पदाधिकाऱ्यांना शांत केले. पक्षातील किरकोळ वादाला जाहीर स्वरुप प्राप्त झाले की, सर्वांचीच बदनामी होते. त्यामुळे दोन्ही पदाधिकाऱ्यांनी संयमाने घ्यावे. एकमेकांच्या पदांवरून टीका करण्यापेक्षा दिलेल्या जबाबदाऱ्या सांभाळाव्यात, अशी सूचना बजाज यांनी केली. त्यानंतर शिंदे व तांबोळी शांत झाले. हा वाद मिटल्याचे जाहीर करून वादावर पडदा टाकण्यात आला. तरीही दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर या वादाचे परिणाम स्पष्टपणे दिसून येत होते. गेल्या काही दिवसांपासून पक्षाला वादाचे ग्रहण लागले आहे. सुरुवातीला युवक कार्यकारिणीच्या निवडींवरून वाद निर्माण झाले होते. आता बैठकांमधूनही याचे पडसाद उमटत आहेत. विधानसभा क्षेत्राच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यातही पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांच्यासमोर मारामारीची घटना घडली होती. त्यानंतर युवकच्या बैठकीत टोमणेबाजीतून वादाची ठिणगी पडली आहे. (प्रतिनिधी)दोन गट : कुरघोड्यांचे राजकारणसांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी सध्या दोन गटात विभागल्याचे चित्र आहे. दोन्ही गटांचे पदाधिकारी एकमेकांच्या गटावर लक्ष ठेवून आहेत. एकमेकांवर कुरघोड्या करताना त्यांना सार्वजनिक स्वरुप देण्याचा प्रयत्न आता दोन्ही गटांकडून सुरू झाला आहे.