शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेनंतर जयंत पाटीलच ‘रेंज’मध्ये

By admin | Updated: January 3, 2015 00:13 IST

मिरज पश्चिम भागातील चित्र : बाकीचे ‘आऊट आॅफ कव्हरेज एरिया’

सोमनाथ डवरी : कसबे डिग्रज :नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विरोधकांनी घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेमुळे माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी एकतर्फी विजय मिळवला. त्यामध्ये त्यांच्या दांडग्या लोकसंपर्काचाही वाटा आहे. आता विजयानंतरही त्यांचा सतत जनसंपर्क आहे, दुसरीकडे मात्र पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी अद्यापही या भागात फिरकलेले नाहीत, तर यंदा निवडणूक लढविणारे, सर्व विरोधकांनी पाठिंबा दिलेले अभिजित पाटील, काँग्रेसचे जितेंद्र पाटील, बी. जी. पाटील ही मंडळीही गायब झाली आहेत.विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ग्रामविकासमंत्री म्हणून मिरज पश्चिम भागातील आठ गावांत जयंत पाटील यांनी संपर्कात सातत्य ठेवले. परिसरातील रस्ते, गटारी, कूपनलिका या कामांबरोबरच विविध शासकीय योजना आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे राजारामबापू समूहातील साखर कारखाना, दूध संघ, बँक या संस्थांच्या माध्यमातून विविध कामे करण्यासाठी नियमित प्रयत्नशील राहिले. तथापि परिसरातील पाच गावांसाठीची ‘पुरा’ योजना अद्यापही सुरू नाही. या योजनेच्या प्रक्रियेत बाकी विकासकामे खोळंबल्याचे चित्र आहे. शिवाय सांगली-पेठ राज्यमार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. कसबे डिग्रज-मौजे डिग्रज पुलाच्या कामाचीही प्रतीक्षा आहे.असे असले तरी दु:खद घटनेवेळी संबंधितांची भेट घेणे, लग्नसमारंभास हजेरी लावणे आदी जनसंपर्काची कामे जयंत पाटील आवर्जून करतात. विधानसभेच्या निवडणुकीनंतर तुंग, सावळवाडी, दुधगाव, कसबे डिग्रज येथे कार्यक्रम घेण्यात आले. कवठेपिरानमधील हिंदकेसरी मारुती माने यांच्या स्मारकाच्या कामास प्रारंभ झाला. यातून जयंत पाटील कायम लोकसंपर्कात असल्याचे दिसते.दुसरीकडे मात्र गत विधानसभेनंतर वैभव नायकवडी या भागात फिरकले नसल्याचे चित्र आहे. हुतात्मा साखर कारखान्यास सर्वसामान्यांचा किती ऊस नेला जातो?, असा प्रश्न विचारला जात आहे.‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी कोठे आहेत?’, असा ‘मेसेज’ व्हॉटस् अपवर फिरत आहे. सोबतीला ‘सदाभाऊंचा बंगला किती मोठा झाला?’ अशीही चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे अभिजित पाटील या भागातील काँग्रेस मतदारांची भेट घेण्यासाठीही आले नाहीत. शिवाय जितेंद्र पाटील आणि बी. जी. पाटील कोठे गायब झाले?, असा सवाल केला जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्नही जैसे थेच आहेत.