शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
3
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
4
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
5
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
6
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
7
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
8
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
9
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
10
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
11
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
12
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
13
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
14
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
15
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
16
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
17
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
18
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
19
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?

तासगाव तालुक्यात २६ अर्ज बाद

By admin | Updated: October 20, 2015 00:18 IST

पोलिसांचा बंदोबस्त : विजयनगर, मोराळे (पेड) बिनविरोध

तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या ३९१ जागांसाठी १५२३ अर्ज दाखल झाले होते. सोमवारी अर्ज छाननीमध्ये २६ अर्ज बाद झाल्याची माहिती तहसीलदार सुधाकर भोसले यांनी दिली. दरम्यान, विजयनगरपाठोपाठ मोराळे (पेड) ग्रामपंचायतीसाठी ७ अर्ज आल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. या दोन्ही गामपंचायती भाजपच्या असल्याचा दावा खा. संजयकाका पाटील गट करीत आहे. तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका चुरशीने लढल्या जात आहेत. यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. अनेक कार्यकर्त्यांची समजूत काढून अर्ज माघारी घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु, नेत्यांच्या शिष्टाचारास काही कार्यकर्ते दाद देत नाहीत. सोमवारी १५२३ अर्जांपैकी २६ अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. मोठ्या संख्येने अर्ज आल्यामुळे छाननीसाठी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होत होती. यावेळी कार्यालयाबाहेर झालेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे व सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)पलूसच्या १४ ग्रामपंचायतींसाठी ७५१ अर्ज पात्रकिर्लोेस्करवाडी : पलूस तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७६६ अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये १९ रोजी झालेल्या छाननीमधून १५ अर्ज बाद झाले. यापैकी निवडणुक ीस पात्र असलेल्या अर्जांची संख्या ७५१ आहे. दि. २१ रोजी अर्ज माघारीचा दिवस आहे. किती अर्ज मागे घेतले जाणार, हे याचदिवशी समजणार आहे. जे अर्ज यामध्ये राहतील, त्यांना २१ रोजीच चिन्हांचे वाटप होणार आहे. तालुक्यात सध्या ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व राखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपमध्ये चढाओढ दिसत आहे. काही ठिकाणी तर काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये दोन-दोन गट असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे येथील निवडणूक तिरंगी होणार असल्याचे बोलले जात आहे. दोन फुटलेल्या गटांची मतविभागणी होणार असल्याने सर्वच पॅनेलनी कंबर कसली आहे.