शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध शिथिलतेबाबत प्रशासनाने पर्याय सुचवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST

सांगली : जिल्ह्यात दीर्घकाळ लॉकडाऊनमुळे जनता व व्यापारी हतबल झाले आहेत. त्यामुळे शहर व गावांमधील पादुर्भाव पाहून शिथिलता देण्यासाठी ...

सांगली : जिल्ह्यात दीर्घकाळ लॉकडाऊनमुळे जनता व व्यापारी हतबल झाले आहेत. त्यामुळे शहर व गावांमधील पादुर्भाव पाहून शिथिलता देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य पर्याय द्यावेत, अशी सूचना कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी रविवारी केली.

ते म्हणाले की, गेली तीन महिने सांगली जिल्हा लॉकडाऊनमध्ये आहे. यामुळे व्यापारी व जनता कमालीची हतबल झाली आहे. मोठा त्रास व नुकसान सहन करावे लागत आहे. सांगली जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णांचे हॉस्पिटलमध्ये जाण्याचे प्रमाण कमी आहे. रुग्णसंख्येअभावी अनेक हॉस्पिटल कोरोनामधून बाहेर पडली आहे. ऑक्सिजन बेडवर सातत्याने महिनाभर ८०० ते साडेआठशेच रुग्ण आहेत. ही संख्या वाढत नाही.

अशा परिस्थितीत लॉकडाऊनमधून काही शिथिलता द्यावीच लागेल. ज्या ठिकाणी प्रादुर्भाव जास्त आहे, अशी ठिकाणे वगळून अन्यत्र शिथिलता देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्याय काही सुचविण्याची गरज आहे. अत्यावश्यक सेवेची दुकाने एक दिवस व इतर दुकाने एक दिवस उघडण्यासारखे काही अन्य नियोजन करणे गरजेचे आहे.

प्रशासनाने पर्याय सुचविल्यानंतर यावर पालकमंत्री जयंत पाटील व आम्ही सोमवारी निर्णय घेऊ. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी यावेळी चर्चा झाली. त्यांनी अंशत: किंवा पर्यायांवर शिथिलता देण्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, महापालिका आयुक्त व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे चौघेजण पर्याय सादर करणार असल्याची माहिती विश्‍वजित कदम यांनी दिली. या पर्यायावर सोमवारी, दि. १९ रोजी अंमलबजावणी केली जाणार आहे.