शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पुरेसा ऑक्सिजन, १२०० रेमडेसिविर इंजेक्शन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST

सांगली : जिल्ह्यासाठी पुण्यातून दररोज ४४ टन ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. मिरज कोविड रुग्णालय व अन्य खासगी रुग्णालयांत ...

सांगली : जिल्ह्यासाठी पुण्यातून दररोज ४४ टन ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. मिरज कोविड रुग्णालय व अन्य खासगी रुग्णालयांत मिळून १२०० रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध आहेत. नियोजन समितीच्या अंदाजपत्रकातून कोविड कामांसाठी ३२ कोटी रुपये मिळतील, अशी माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी शनिवारी येथे पत्रकारांना दिली.

ते म्हणाले की, कोरोना लसीच्या टंचाईवर मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय होणार आहे. उपलब्ध लसीतून दुसरा डोस देण्याला प्राधान्य राहील. लसीसाठी महाराष्ट्राला झुकते माप द्यावे, अशी मागणी आहे. कोरोनाबाधितांसाठी व्हेंटिलेटरचा सरसकट वापर चुकीचा आहे. त्याबाबत डॉक्टरांशी चर्चा करून व्यूहरचना ठरविणार आहोत.

ते म्हणाले की, ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत; पण ऑक्सिजनचा आणि व्हेंटिलेटरचा वापर चुकत आहे. त्यावर निर्बंध गरजेचे आहेत. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांसाठीच व्हेंटिलेटर वापरावे. सांगली जिल्ह्यात ऑक्सिजन टंचाई कमी करण्यासाठी पुण्यातून दररोज ४४ टन पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. मिरज कोविड रुग्णालय व अन्य खासगी रुग्णालयांत मिळून १२०० रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध आहेत. नियोजन समितीच्या अंदाजपत्रकातून १० टक्के निधी कोविड कामांसाठी राखीव असून, त्याद्वारे ३२ कोटी रुपये मिळतील. मिरज, जत, माडग्याळ, चिंचणी-वांगी, आटपाडी, विटा, आदी रुग्णालयांत जंबो सिलिंडर वाढविणार आहोत. येत्या शनिवारपर्यंत ५० व्हेंटिलेटर मिळतील, त्यातून मिरज कोविड रुग्णालयाला २५, सांगली रुग्णालयाला २० दिले जातील. नियोजन समितीच्या निधीतून १५ व्हेंटिलेटर मिळतील. सर्वाधिक व्हेंटिलेटर असणाऱ्या राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये सांगलीचा समावेश आहे. घरातच उपचार घेणारे रुग्ण प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात येतात, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

चौकट

‘भारती’मध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

सांगली व पुण्यात भारती रुग्णालयांत प्रत्येकी साडेचार कोटी रुपये खर्चाचे तीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रत्येक प्रकल्पात मिनिटाला ५०० लिटर द्रवरूप ऑक्सिजन निर्मिती होईल. महिनाभरात प्रकल्प कार्यान्वित होतील. गरजेनुसार अन्य रुग्णालयांनाही ऑक्सिजन पुरविला जाईल, असे डॉ. कदम म्हणाले.