शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित अर्थसंकल्पात १५ कोटींची वाढीव तरतूद

By admin | Updated: July 17, 2014 23:39 IST

जिल्हा परिषद : अर्थ समितीत निर्णय; ३० जुलैरोजी अंतिम मंजुरी; स्थानिक निधीत वाढ

सांगली : जिल्हा परिषदेमध्ये आज, गुरुवारी अर्थ समितीच्या सभेत प्रथम सुधारित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यापूर्वी जाहीर झालेल्या २८ कोटी ६१ लाख रुपयांच्या मूळ तरतुदीखेरीज सुधारित अर्थसंकल्पात विविध योजनांसाठी १४ कोटी ९८ लाख रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आज सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प ४३ कोटी ६० लाख रुपये रकमेचा झाला आहे. दरम्यान स्थानिक विकास निधीमध्ये ३ लाखांची वाढ करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचा २८ कोटी ६१ लाख रुपयांचा अर्थसंकल्प कासेगाव (ता. वाळवा) येथे झालेल्या सभेत मांडण्यात आला होता. त्यावेळी विषय समित्यांच्या निधीत काही प्रमाणात कपात करण्यात आली होती. त्यानंतर राज्य शासनाकडून येणेबाकीपैकी १९ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. साहजिकच प्रथम सुधारित अर्थसंकल्पात ही उणीव भरुन काढण्यात येणार असल्याचे संकेत अर्थ समिती सभापती आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिले होते. त्यानुसारच अर्थसंकल्प आज जाहीर करण्यात आला. आज झालेल्या अर्थ समितीच्या सभेत सुधारित अर्थसंकल्प मांडला गेला. आता तो ३० जुलैरोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येणार आहे. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब त्याचवेळी होणार आहे. महिला, बालकल्याण विभागाच्या व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणासाठी ६ लाख ६८ हजारांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ७ वी आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या संगणक प्रशिक्षण योजनेसाठी ११ लाख, महिलांना विविध साहित्य पुरविण्यासाठी ८ लाख ४२ हजार रुपयांची वाढ झाली आहे. अपंग घरकुल योजनेसाठी ८६ लाख, नैसर्गिक आपत्ती सहाय्यतासाठी १० लाख, समाजकल्याणच्या वसंत घरकुल योजनेसाठी ७० लाख, मागासवर्गीय व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साहित्य पुरविण्यासाठी २५ लाख, कृषी विभागातील चाप कटरसाठी २५ लाख, शेती गोदामे बांधणे आणि दुरुस्तीकरिता १४ लाख ५० हजार, शेतकऱ्यांना ताडपत्री पुरविणे २० लाख १ हजार, शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानात स्प्रे पंप पुरविणे ४ लाख ५० हजार, पशुसंवर्धन विभागातील शेळी गटवाटप योजनेसाठी १५ लाख, शाळांना भौतिक सुविधा पुरविणेकामी २४ लाख ५० हजार, शाळांमध्ये संगणकासाठी ५० लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. (वार्ताहर)