शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

सांगलीत कारवाई : वीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

By admin | Updated: September 11, 2014 00:37 IST

‘उपनिबंधक’चा लिपिक जाळ्यात

सांगलीत कारवाई : वीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले‘उपनिबंधक’चा लिपिक जाळ्यातसांगली : सावकारीचा परवाना देण्यासाठी २० हजारांची लाच घेताना मिरज येथील सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातील लिपिक सुरेश बबनराव चव्हाण (वय २७, रा. गल्ली क्र. १, विजयनगर, सांगली) याला आज (बुधवार) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई येथील राम मंदिर चौकात करण्यात आली. सुरेश चव्हाण मिरज येथील सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात लिपिक आहे. संबंधित तक्रारदारास सावकारीचा परवाना हवा होता. गेल्या सहा महिन्यांपासून त्याचे उपनिबंधक कार्यालयाकडे हेलपाटे सुरू होते. मात्र सुरेश चव्हाण याने सावकारीचा परवाना देण्यासाठी २५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. याबाबत तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आज सकाळी तक्रार केली. त्यानंतर तक्रारदाराने चव्हाण याला दूरध्वनी करून, २५ हजारामधील काही रक्कम कमी करण्याची विनंती केली. तडतोडीनंतर २० हजार रुपयांत व्यवहार ठरला. पैसे देण्यासाठी मिरज येथील कार्यालयात येतो, असे तक्रारदाराने सांगितल्यानंतर, ‘दुपारी दोन वाजता आपण सांगलीत येणार असून तेथेच पैसे द्यावेत’, असे चव्हाण याने सांगितले. त्यांचे हे बोलणे मोबाईलवर रेकॉर्ड (ध्वनिमुद्रित) करण्यात आले.चव्हाण दुपारी सव्वादोनला एका बँकेच्या बैठकीला हजर राहण्यासाठी सांगलीतील राममंदिर चौकात आला व तेथूनच त्याने तक्रारदारास दूरध्वनी करून बोलावून घेतले. यावेळी राममंदिर चौकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. तक्रारदाराकडून वीस हजारांची लाच स्वीकारताना चव्हाण याला रंगेहात पकडण्यात आले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उद्या (गुरुवार) चव्हाण याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. सामान्यांची राजरोस लूटसहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात सामान्यांची राजरोस लूट सुरू असते. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याचा उपयोग झालेला नाही. वरिष्ठांकडूनही याची दखल घेतली गेलेली नाही. आतातरी या कार्यालयातील कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे.