शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दररोज एकाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: January 15, 2017 23:34 IST

प्रमाण चिंताजनक : वर्षभरात ८०३ अपघात, ४०३ जणांचा बळी; तीन वर्षात दीडशे घटना वाढल्या

सचिन लाड ल्ल सांगलीजिल्ह्यात दररोज एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०१६ मध्ये ८०३ अपघात झाले आहेत. यामध्ये ४०३ जणांचा मृत्यू झाला, तर ८४१ जखमी झाले आहेत. अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या तीन वर्षांत अपघातांमध्ये बळी गेलेल्यांच्या संख्येत दीडशेने वाढ झाली आहे. आरटीओ व पोलिसांकडून अपघातांना आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचेच चित्र आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्यातील कणेगाव ते कासेगाव ही २८ किलोमीटरची हद्द येते. मिरज-पंढरपूर असे दोन राष्ट्रीय, तर सांगली ते तासगाव, मिरज-विजापूर, वसगडेमार्गे कऱ्हाड, सांगली ते पेठ, सांगली ते कोल्हापूर असे पाच राज्य महामार्ग आहेत. या प्रत्येक महामार्गावर नेहमी अपघात होतात. घरापासून हाकेच्या अंतरावर बाजारात खरेदीसाठी जातानाही आता वाहनांचा वापर होऊ लागला आहे. रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. वाहने वापरण्याकडे कल वाढला असला तरी, वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे वाहनचालकांचा फारसा कल दिसत नाही. जिल्ह्यात दरवर्षी सहाशेहून अधिक अपघात होत आहेत. यामध्ये तीनशे ते सव्वातीनशे लोकांचा बळी जात आहे. कासेगाव-कणेगाव, सांगली-इस्लामपूर, सांगली-तासगाव, विटा-पलूस-कऱ्हाड, अंकली-मिरज, मिरज- पंढरपूर या मार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. रस्ता खराब असल्याने अपघात होण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. पोलिसांची संख्या अपुरीजिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. ७०५ गावे आणि २८ लाख २0 हजार ५७५ इतकी लोकसंख्या आहे. आज प्रत्येक घरात दुचाकी आहे. वाहनांची संख्या वाढत असताना, रस्त्यांची लांबी-रुंदी मात्र अपवाद वगळता तेवढीच राहिली आहे. सांगली, मिरज, कुपवाड ही तीन प्रमुख शहरे वगळली, तर दहा तालुक्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना या विभागाची कसरत सुरू असते. वाहनधारकांना स्वयंशिस्त असणे महत्त्वाचे असले तरी, ती लागत नसल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांची संख्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वाढविण्याची गरजही आता निर्माण झाली आहे. अपघाताला मानवी चुकाच अधिक कारणीभूतगेल्या तीन वर्षांत साधारणपणे अडीचशे ते तीनशे लोकांचा अपघातात बळी गेल्याची सरासरी आकडेवारी आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक अपघात हे मानवी चुकांमुळे झालेले आहेत. पोलिस व आरटीओंनी कारवाईची मोहीम उघडली, अपघाताला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या; पण तरीही २०१६ मध्ये तीन वर्षाच्या तुलनेत अपघातांची संख्या वाढल्याचेच आकडेवारीवरून दिसून येते. हे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करूनही, मानवी चुकांमुळे त्यात वाढच झाली आहे. पुढे धोका आहे... सावकाश...सांगली-कोल्हापूर, मिरज-पंढरपूर, सांगली-पुणे यासह पाचही महामार्गावर वेडीवाकडी वळणे आहेत. रस्त्याकडेला शाळा, महाविद्यालये आहेत. या सर्व ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘पुढे धोका आहे’, अशी माहिती दर्शविणारे फलक लावून ‘वाहने सावकाश चालवा’, असे फलक लावले आहेत. मात्र या फलकांकडे पाहण्यास कुणालाही वेळ नाही. प्रत्येकाला पुढे जाण्याची असणारी घाई मृत्यूच्या दाढेत नेत आहे. यातून जिल्ह्यात कुठे ना कुठे लहान-मोठे अपघात होतच आहेत. सांगली-माधवनगर रस्त्यावरील रेल्वे पुलावरही ओव्हरटेक न करण्याची स्पष्ट सूचना असतानाही, हा नियम सर्रास डावलला जातो. त्यामुळे या रस्त्यावरही गेल्या दोन वर्षात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.जिल्ह्यात अपघाताची एकूण ४0 ठिकाणेसांगली-इस्लामपूर रस्त्यावरील कारंदवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा, आटपाडी तालुक्यातील भिवघाट, सांगलीतील चिंतामणीनगर रेल्वे पूल, मिरज रस्ता सांगली-तासगाव रस्ता यासह ६४ अपघाताची ठिकाणे असल्याचे सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे.