शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अबब! ११ अजस्त्र मगरी, ७५ पिले

By admin | Updated: June 15, 2015 00:17 IST

कृष्णाकाठ मगरमिठीत : भिलवडी ते आमणापूरच्या नदीकाठावरील स्थिती

भिलवडी : तीन महिन्यांपासून मगरीने माणसांवर सुरू केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचंड दहशतीखाली वावरणाऱ्या कृष्णाकाठाला रविवारी आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी व आमणापूर येथील कृष्णा नदीकाठावर ७५ मगरीची पिल्ली सापडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांपासून वनविभागाने सुरू केलेल्या सर्व्हेच्या प्राथमिक फेरीमध्ये अंकलखोप, भिलवडी, औदुंबर, धनगाव ते आमणापूर गावच्या नदी किनाऱ्यालगतच्या नदीपात्रात ११ अजस्त्र मगरी असल्याचेही निष्पन्न झाल्याने कृष्णाकाठी पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भिलवडी येथील कृ ष्णा नदीकाठावर असलेल्या पाणंद रस्ता परिसरातील शिवाजी लिफ्टच्या जॅकवेलजवळ असणाऱ्या यादव मळीमध्ये मगर दिसली. शेतात काम करणारे शेतकरी शशिकांत यादव हे नदी किनारी गेले असता, पाण्यात पन्नासावर मगरीची पिल्ली तरंगत असल्याचे दिसले. त्यांच्यासोबत मोठी मगर होती. आसपास माणसे दिसली किंवा एखादे जनावर दिसले तर, मगर आक्रमक होत असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले. पिलांना सोडून ही मगर दुसरीकडे कोठेच जात नसल्याची माहिती पाहणारे नागरिक देत आहेत. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आमणापूर येथील श्रीराम जॅकवेलजवळ सतीश माळी यांच्या पोटमळीमध्ये सहा फुटलेली अंडी आढळून आली. मगरीने ही अंडी फोडून त्यातून जन्माला आलेली सहा पिले नदीपात्रामध्ये ओढून नेताना शेतकऱ्यांनी पाहिली आहे. ही मगर अंदाजे बारा फूट लांबीची होती. ही पिल्ली सरड्याच्या आकाराएवढी असल्याची माहिती जॅकवेलचालक विष्णू बापू पवार यांनी दिली. यापूर्वी २७ मे रोजी भिलवडी येथील पुलाजवळील नदीकाठावर मगरीची अंडी व पिले नागरिकांच्या दृष्टीस पडली होती. या ठिकाणी मासेमारी करण्यास गेलेल्या अशोक नलवडे या मच्छिमारावर संतापलेल्या मगरीने हल्ला चढवून जखमी केले होते. कृ ष्णा नदीकाठावर मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या मगरींच्या हल्ला सत्रानंतर वनविभागाने आमणापूर ते सांगलीदरम्यान वनपाल व वनसंरक्षकांचा खडा पहारा तैनात केला आहे. मगरींचा प्रजनन कालावधी सुरू असून, ज्या ठिकाणी अंडी व पिले आढळतात, त्या ठिकाणी नागरिकांना पाण्यात न जाण्याबाबत आमणापूर येथील वननिरीक्षक तानाजी माळी यांनी आवाहन केले आहे. वनविभागाकडून मगरींची गणती मुंबई येथील खास पथकांकडून तीन बोटींतून तीन स्वतंत्र पथकांनी सांगली ते आमणापूरदरम्यान कृ ष्णाकाठाची पाहणी करून खास दुर्बिणीचा वापर करून मगरींची गणती केली आहे. आमणापूर, धनगाव, औदुंबर, अंकलखोप या गावांदरम्यान प्रथमदर्शनी पाहणीत ११ मोठ्या मगरी, तर १९ पिल्ली आढळून आली असून, अंतिम गणतीनंतरच मगरींची नेमकी संख्या समजणार असल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगतात.