शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे ९८८ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी दिवसभरात ९८८ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी दिवसभरात ९८८ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर परजिल्ह्यातील चौघांसह जिल्ह्यातील २० अशा २४ जणांचा मृत्यू झाला. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचेही प्रमाण घटले असून, ७७२ जण कोरोनामुक्त झाले. म्युकरमायकोसिसचा नवीन एक रुग्ण आढळला.

जिल्ह्यातील २० जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली २, मिरज १, वाळवा ६, पलूस, मिरज तालुक्यातील प्रत्येकी ३, जत २, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

आरोग्य यंत्रणेकडून आरटीपीसीआर अंतर्गत २,९०७ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात ३९३ जण बाधित आढळले तर रॅपिड ॲन्टिजनच्या ७,२९८ जणांच्या तपासणीतून ६२५ जण पॉझिटिव्ह आढळले.

यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, सध्या ८,५४४ जण उपचार घेत आहेत. त्यातील १,०३९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ९११ जण ऑक्सिजनवर तर १२८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील चारजणांचा मृत्यू झाला तर ३० नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १,३९,८२५

उपचार घेत असलेले ८,५४४

कोरोनामुक्त झालेले १,२७,३१३

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३,९६८

पॉझिटिव्हिटी रेट ९.९७

गुरुवारी दिवसभरात

सांगली १४१

मिरज ४४

आटपाडी १८

कडेगाव १०४

खानापूर ५६

पलूस ९३

तासगाव ६५

जत ४०

कवठेमहांकाळ ३३

मिरज तालुका ९२

शिराळा ६८

वाळवा २३४