शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८०२ नवे रुग्ण; २५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी काहीशी घट झाली. दिवसभरात ८०२ नवे बाधित आढळले. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी काहीशी घट झाली. दिवसभरात ८०२ नवे बाधित आढळले. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, ९८९ जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यातील दोघांसह जिल्ह्यातील २३ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली ६, मिरज २. कुपवाड १, पलूस, कडेगाव प्रत्येकी ३, वाळवा, मिरज तालुक्यात प्रत्येकी २, जत, शिराळा, खानापूर, तासगाव तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

दिवसभरात आरटीपीसीआरअंतर्गत २७८१ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ३३३ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ७४४० जणांच्या नमुन्यांच्या चाचणीतून ४८६ जण पॉझिटिव्ह आढळले.

उपचार घेत असलेल्या ९१०६ रुग्णांपैकी १०५६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८४९ जण ऑक्सिजनवर, तर २०७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला, तर १७ नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.

चौकट

म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत शुक्रवारी वाढ होत दोघांना निदान झाले. त्यामुळे बाधितांची संख्या २५५ वर पोहोचली आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १३४७५५

उपचार घेत असलेले ९१०६

कोरोनामुक्त झालेले १२१८०५

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३८४४

पॉझिटिव्हीटी रेट ८.११

शुक्रवारी दिवसभरात

सांगली ९८

मिरज ३६

आटपाडी ३२

कडेगाव ७८

खानापूर २८

पलूस ५४

तासगाव ५६

जत २९

कवठेमहांकाळ ५३

मिरज तालुका १३२

शिराळा ५५

वाळवा १५१