शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

‘सिव्हिल’च्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचा प्रस्ताव सादर

By admin | Updated: January 18, 2016 23:30 IST

इमारतीची रंगरंगोटी : दरवाजे, खिडक्या बदलणार

सचिन लाड --सांगली ,येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल) इमारत दुरुस्तीसाठी सुमारे आठ कोटी रुपयांची गरज आहे. तसा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य शासनाला सादर केला आहे. पण त्याला अजूनही मंजुरी मिळालेली नाही. रुग्णालयाच्या इमारतीची रंगरंगोटी, दरवाजे व खिडक्या बदलल्या जाणार आहेत. जलवाहिनी खराब झाल्याने तीही बदलण्याची गरज असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. शासकीय रुग्णालयाच्या इमारतीस पन्नास वर्षे होऊन गेली आहेत. जुनी इमारत सुस्थितीत आहे. पण त्याच्याभोवती भाजलेल्या रुग्णांचा कक्ष, रक्तपेढी, शवविच्छेदन विभाग, क्षयरोग, संसर्गजन्य विभाग, रुग्णांचे स्वतंत्र वॉर्ड, धोबीघाट या विभागांच्या इमारती आहेत, त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. शवविच्छेदन विभाग रुग्णालयाच्या मागे आहे. हा विभाग आतून स्वच्छ आहे. दुर्गंधीही येत नाही. पण त्याच्या खिडक्या, दरवाजे गंजले आहेत. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे आत काय सुरू आहे, हे सहजपणे दिसून येते. दररोज दोन- तीन मृतदेहांची विच्छेदन तपासणी केली जाते. मृतदेहांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या विभागाची दुरुस्ती महत्त्वाची आहे. रुग्णांच्या वॉर्ड विभागाचीही अशीच अवस्था आहे. पाठीमागील बाजूच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. भिंतींना तडे गेले आहेत. पाणीपुरवठ्याची वाहिनी फुटल्याने पाणी मुरून भिंती शेवाळल्या आहेत.संसर्गजन्य विभाग व रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय असलेल्या धर्मशाळेची इमारतही जुनी दिसू लागली आहे. इमारतीचा रंग उडाला आहे. फरशा फुटलेल्या आहेत. छताला गळती लागल्याने पावसाळ्यात पाणी आत पडते. परिसरात झाडेझुडपे वाढली आहेत. भाजलेल्या रुग्ण कक्षाच्या खिडक्या फुटल्या आहेत. भिंतीत केवळ खिडकीचा आकार उरला आहे. नातेवाईक या खिडकीतूनच रुग्णांची भेट घेतात. रुग्णालयाकडे स्वतंत्र पाण्याची सोय आहे. यासाठी मोठी टाकीही बांधलेली आहे. पण ही टाकी व जलवाहिनी जुनी झाली आहे. सातत्याने गळती होत असल्याने पाणी पसरून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रुग्णांच्या सुरक्षेचाही प्रश्न...रुग्णांच्या वॉर्डात शौचालयाचे दरवाजे मोडले आहेत. खिडक्यांचा सांगाडाच शिल्लक आहे. पावसाळ्यात या खिडक्यांतूनही पाणी आत येते. इचलकरंजीतील एका रुग्णाने शौचालयाच्या खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी एका रुग्णाच्या आत्महत्येचा प्रयत्न फसला होता. आणखी एकाने शौचालयाच्या खिडकीच्या गजाला टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रुग्णांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ही इमारत धोक्याची ठरू लागली आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.