शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ७१ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST

जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले आहेत. गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले, तरीही ...

जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले आहेत. गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले, तरीही कारखानदारांनी एकरकमी एफआरपी दिलीच नाही. शुगरकेन कंट्रोल कायदा १९६६ नुसार शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे, अन्यथा कारखाना व्यवस्थापनाने संबंधित शेतकऱ्यास व्याजासह रक्कम देण्याचे बंधनकारक आहे. एकरकमी एफआरपी देण्याची कायदेशीर तरतूद असतानाही बड्या राज्यकर्त्यांच्या ११ कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दोन महिन्यांत दिली नाही. सोनहिरा, उदगिरी शुगर, दालमिया आणि निनाईदेवी-दालमिया या कारखान्यांनीच गाळपास गेलेल्या ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी दिली आहे. उर्वरित राजारामबापू साखराळे, वाटेगाव, सर्वोदय आणि डफळे या चारही युनिटकडून एकरकमी एफआरपी दिली नाही. वसंतदादा-दत्त इंडिया, क्रांती, हुतात्मा, विश्वास, तासगाव, यशवंत या कारखाना व्यवस्थापनानेही शेतकऱ्यांना पहिला हप्ताच दिला आहे. उर्वरित दुसरा हप्ता देण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. या अकरा कारखान्यांकडे शिल्लक एफआरपीचे ७१ कोटी १५ लाख ७७ हजार २५० रुपये थकीत आहेत. या शेतकऱ्यांनी एकरकमीची एफआरपी मागणी केली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यासाठी आक्रमक झाली आहे.

चौकट

जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळप केलेला ऊस

कारखाने गाळप साखर पोती उतारा

वसंतदादा-दत्त इंडिया ४१७५३० ४७५४७० ११.३९

राजारामबापू साखराळे ४३५४७० ५११८०० ११.७५

विश्वास-चिखली ३१६८२० ३३००२० १०.४२

हुतात्मा-वाळवा २६२०३० २८८०२५ १०.९९

राजारामबापू-वाटेगाव २६११४० ३०८३०० ११.८१

तासगाव-तूरची ३६२७१ ३४२०० ९.४३

राजारामबापू-डफळे ९४०७० ८७७७० ९.३३

सोनहिरा-वांगी ४४१८४५ ४९४२२० ११.१९

क्रांती-कुंडल ४३८२४० ४८७५९० ११.१३

सर्वोदय-राजारामबापू १९७६७० २२७७१० ११.५२

मोहनराव शिंदे-आरग १५६५९० १७११५० १०.९३

निनाईदेवी-दालमिया १८१९४५ २१२९५० ११.७१

यशवंत-खानापूर ६१३८२ ६४३५० १०.४८

उदगिरी शुगर २८३९१० ३१०००० १०.९२

सद्गुरू श्री श्री राजेवाडी ३२५६९५ ३५००३९ १०.७५

एकूण ३९१०६०८ ४३५३५९४ ११.१३