शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांमुळे ७०० कोटींचा निधी

By admin | Updated: May 3, 2017 01:18 IST

भाजप-ताराराणी आघाडीचा दावा : काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेली टीका निरर्थक, अविचारी

कोल्हापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या अडीच वर्षांत शहरासाठी ७०० ते ७५० कोटींचा निधी खेचून आणला आहे, असा दावा महानगरपालिकेतील भाजप व ताराराणी आघाडीतर्फे करण्यात आला. दादांसारख्या निष्कलंक व विकासाची दृष्टी असलेल्या नेत्यावर कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेली टीका ही निरर्थक व अविचारी असल्याचे यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या अंदाजपत्रकातील त्रुटी दाखवून दिल्यानंतर आणि या कामात घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर महापालिकेतील कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शहरासाठी काय केले, त्यांनी किती निधी आणला, पालिकेच्या कामांसाठी किती वेळ दिला, असे सवाल उपस्थित केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधी पक्षनेते किरण शिराळे, भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी पालकमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षांत किती निधी आणला, याची यादीच जाहीर केली. पालकमंत्री पाटील यांनी शहरासाठी आणलेल्या निधीची यादी आणि त्यांनी लावलेल्या कामांचा धडाका पाहिला तर ते शहरासाठी वेळ देत नाहीत, असे म्हणणे गैर आणि बालबुद्धीचे आहे. उलट ही कामे पूर्ण झाली तर त्याचे श्रेय चंद्रकांतदादा पाटील व पर्यायाने भाजपला मिळेल म्हणून महापालिकेतील कॉँग्रेसचे नेते व नगरसेवक त्यांची भेट घेण्याचे टाळत आहेत. शहराचा सर्वांगीण विकास, पर्यटनवाढ व शहराचे सौैंदर्यीकरण करून कोल्हापूर हे श्रीमंत शहर बनविण्याच्या दादांच्या स्वप्नातील विकासाचे साक्षीदार होणार असाल तर मोठ्या मनाने आजपर्यंत झालेला, होत असलेला विकास खिलाडूवृत्तीने मान्य करून, नवनवीन संकल्पना घेऊन लेखी पत्राने विनंती केल्यास पालकमंत्री नक्कीच वेळ देतील, असे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)पालकमंत्र्यांनी आणलेल्या निधीची यादीशहर टोलमुक्तीसाठी- ४५० कोटी नगरोत्थान- ५ कोटी दलित वस्ती- १.५० कोटी दलितेतर- ७.४० कोटी पूरहानी- २.८० कोटी मनपा विशेष निधी- २० कोटी अमृत योजना- ७२ कोटी शास्त्रीनगर क्रीडांगण विकास- ३ कोटी शहरांतर्गत विद्युत कामे- २२ कोटी चित्रनगरी विविध कामे- २८ कोटी शाहू जन्मस्थळ- २.१० कोटी राजाराम महाविद्यालय इमारत बांधकाम- ३.८१ कोटी शहरातील रिंग रोड- ६१ कोटी मेडिकल कॉलेज, शेंडा पार्क- ७१.२७ कोटी बस खरेदी दुसरा हप्ता- ३.८८ कोटी नावीन्यपूर्ण योजना- १.२५ कोटी. पालकमंत्र्यांनी आणलेल्या निधीची यादीशहर टोलमुक्तीसाठी- ४५० कोटी नगरोत्थान- ५ कोटी दलित वस्ती- १.५० कोटी दलितेतर- ७.४० कोटी पूरहानी- २.८० कोटी मनपा विशेष निधी- २० कोटी अमृत योजना- ७२ कोटी शास्त्रीनगर क्रीडांगण विकास- ३ कोटी शहरांतर्गत विद्युत कामे- २२ कोटी चित्रनगरी विविध कामे- २८ कोटी शाहू जन्मस्थळ- २.१० कोटी राजाराम महाविद्यालय इमारत बांधकाम- ३.८१ कोटी शहरातील रिंग रोड- ६१ कोटी मेडिकल कॉलेज, शेंडा पार्क- ७१.२७ कोटी बस खरेदी दुसरा हप्ता- ३.८८ कोटी नावीन्यपूर्ण योजना- १.२५ कोटी.