शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

५४ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखणार

By admin | Updated: January 15, 2016 00:27 IST

जिल्हा परिषद : स्वच्छ भारत अभियानातील कसूर भोवली

सांगली : स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी दिलेले उद्दिष्ट पूर्र्ण करण्यात दिरंगाई करणाऱ्या जिल्ह्यातील ५४ ग्रामसेवकांना त्यांची एक वेतनवाढ रोखण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटिसीला आठवड्याभरात उत्तर देण्याची संधी देण्यात आली असून, येत्या तीन महिन्यांत उद्दिष्टपूर्ती करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी गुरुवारी दिली. जिल्ह्यात निर्मलग्राम नसलेल्या १०७ गावांमध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणीचे काम सुरू आहे. यातील ५४ गावांत, दिलेल्या उद्दिष्टांपेक्षाही कमी काम होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यासाठी संबंधित गावांच्या ग्रामसेवकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयाची कमी कामे झालेली गावे पुढीलप्रमाणे : शिराळा तालुका- धामवडे, गुढे, तडवळे, शिराळा, चिखलवाडी, वाकाईवाडी, पाडवेवाडी, खुजगाव व येळापूर या गावांत दहा टक्क्यांपेक्षाही कमी काम झाले आहे, तर रेड, पाचुंब्री, हातेगाव, मणदूर, निगडी, करंजगी, खिरवडे, कदमवाडी, चिंचोळी, पणुंब्रे, पावळेवाडी, वाकुर्डे बुद्रुक व गिरजवडे या गावात २५ टक्क्यांपेक्षाही कमी काम झाले आहे. वाळवा : कासेगाव, बोरगाव, वाळवा, तुजारपूर, चिकुर्डे. जत तालुका : वाळेखिंडी, बेवनूर, आवंढी, उमराणी, मिरज तालुका : माधवनगर, बेडग, खटाव. तासगाव तालुका : पेड, येळावी, वायफळे, कुमठे, सावर्डे, सावळज, नागाव कवठे, लिंब, आटपाडी तालुका : करगणी. कवठेमहांकाळ तालुका : कोकळे, थबडेवाडी, खरशिंग, इरळी, कवठेमहांकाळ, तिसंगी, नागज, चुडेखिंडी, हिंगणगाव, नांगोळे व कुकटोळी या गावांच्या सर्व ग्रामसेवकांना वेतनवाढ रोखण्याची नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे ग्रामसेवकांत खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)शिराळ्यातील सर्वाधिक गावेवैयक्तिक शौचालय बांधणीस १२ हजार रुपयांचे अनुदानही देण्यात येत असताना, जिल्ह्यातील ५४ गावांत या अभियानाने गती पकडली नव्हती. त्यासाठी ग्रामसेवकांना वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवकांना एक वेतनवाढ रोखण्याची नोटिसा बजाविण्यात आली आहे. यात शिराळा तालुक्यातील सर्वाधिक २२ गावांचा समावेश आहे.