शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

जिल्हा परिषदेत ५३ वर्षांच्या दफ्तरांची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:21 IST

जिल्हा परिषदेत ५३ वर्षांच्या दफ्तरांची स्वच्छता

अशोक डोंबाळे । लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वर्षानुवर्षे लेखी दफ्तरात अडकलेली जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांची कार्यालये आता डिजिटल होऊ पाहत आहेत. कागदपत्रांचा भार कमी व्हावा, यादृष्टीने विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून पुणे विभागात अभिलेख वर्गीकरण व नासीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याचा प्रारंभ जिल्हा परिषदेतून झाला असून ५३ वर्षांच्या दफ्तरांचे वर्गीकरण करून अनावश्यक दफ्तर निकाली काढण्यास सुरुवात झाली आहे.पुणे विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदांच्या कार्यालयांमधील १९९२ ते २०१२ या वीस वर्षांच्या कालावधीतील जुने दफ्तर तपासून आवश्यक असलेल्या कागदपत्रांचे वर्गीकरण आणि अनावश्यक पत्रे नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी ३१ जुलैची डेडलाईन देण्यात आली आहे. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली मागील चार दिवसांपासून कार्यालयीन वेळेत स्टोअर रुममधील सर्व कागदपत्रांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. प्रत्येक विभागाचे दफ्तर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहे. स्थापनेपासून म्हणजे १९६४ पासूनचे सर्वच विभागांचे दफ्तर चाळण्याचे काम सुरु झाले. छाननी करुन अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. महिनाअखेरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.गेल्या ५३ वर्षांपासून अडगळीत ठेवलेले दफ्तर काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन, कृषी, बांधकाम, शिक्षण, समाजकल्याण, ग्रामपंचायत विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी झाडून कामाला लागले आहेत. अनेक वर्षांपासून दफ्तर स्टोअर रुममध्ये ठेवण्यात आल्याने त्यावरील धूळ झटकून ते हातावेगळी करण्यात कर्मचारी गढून गेल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. सायंकाळच्या वेळीही हे काम सुरु होते. आतापर्यंत वीस ते पंचवीस टन फायलींची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्गवारी केल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जोशी यांनी सांगितले.जिल्हा परिषदेबरोबरच पंचायत समिती, ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रांतही या मोहिमेस सोमवारपासून वेग येईल. यात कोणीही कुचराई केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल, अशा सूचना तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावर या आदेशाचे पालन करण्याची ग्रामसेवकांना नोटीस बजावली आहे. ग्रामपंचायत विभागानेही दीडशे पोती भरून गठ्ठे तयार केले आहेत.कागदपत्रांचे डिजिटलायझेशनजुन्या दफ्तरांच्या वर्गीकरणानंतर आवश्यक कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. संगणकामध्ये संबंधित माहिती नोंद करण्यात येणार असल्याने जुने महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे आणि कागदपत्रांसाठी व्यापली जाणारी जागाही वाचणार आहे. ग्रामीण स्तरावर या मोहिमेचे गांभीर्य ओळखून महिनाअखेर काम संपुष्टात कसे येईल, याची खबरदारी घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी दिले आहेत.लोंढे प्रकरणातील २६ फायलीही सापडल्यामाध्यमिक शिक्षण विभागाकडील बेकायदेशीर मान्यता दिल्यामुळे तत्कालीन उपशिक्षणाधिकारी आणि प्रभारी शिक्षणाधिकारी डी. सी. लोंढे यांचा कारभार चांगलाच गाजला होता. लोंढे प्रकरणातील बेकायदेशीर मान्यता प्रकरण उजेडात आल्यानंतर सुमारे २६ फायलीच गायब झाल्या होत्या. सीईओंच्या स्वच्छता मोहिमेत लोंढेंनी मान्यता दिलेल्या व गायब झालेल्या २६ फायली माध्यमिक शिक्षण विभागाच्या गोदामामध्ये सापडल्या आहेत. एवढेच नव्हे, तर सेवा पुस्तक हे त्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु, माध्यमिक विभागाच्या बहाद्दरांची सेवापुस्तकेही गोदामामध्ये सापडली आहेत.हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाईजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयापासून सुरू झालेली ही मोहीम ग्रामस्तरापर्यंतही राबवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने ग्रामपंचायती, पंचायत समितीतील विविध विभागांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. यात कोणीही हयगय न करता जबाबदारीने कामे पार पाडावीत. यात कोणी कसूर केली, तर त्यांची गय केली जाणार नाही, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.तासगावात १०० संगणक धूळ खात पडूनतासगाव पंचायत समितीच्या गोदामामध्ये १०० संगणक आणि ४० टायर धूळ खात पडल्याचे आढळून आले. टायर बाद असतील म्हणून ठेवली असतीलही. पण, संगणकाची १९९६ मध्ये खरेदी केल्यानंतर त्यांचा वापर का झाला नाही? त्यांचा वापर केला, की ती तशीच गोदामामध्ये टाकून दिली? याचाही अधिकाऱ्यांना प्रश्न पडला आहे. संगणकाच्या बॉक्समध्ये सापाची पिले सापडल्याने अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. काही महत्त्वाची कागदपत्रेही सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.अशी आहे फायलींची वर्गवारी...‘अ’ वर्गीय फायलींचा गठ्ठा कायमस्वरूपी असून त्याचा रंग लाल, ‘ब’ वर्गीय ३० वर्षापर्यंत त्याचा रंग हिरवा, ‘क’ वर्गीय दहा वर्षे रंग पिवळा, ‘क-१’ वर्गीय पाच वर्षे रंग सफेद आहे. ‘ड’ वर्गीय एक वर्षापर्यंतच गठ्ठा ठेवणार आहे.