शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

कडक लॉकडाऊनमध्येही ५० टक्के बसेस सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

सांगली : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातील विविध ...

सांगली : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातील विविध मार्गावर दर दोन तासाला एक बस सोडण्यात येणार आहे. या बसेस केवळ रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांच्या सोयीसाठी राहतील, असे विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी सांगितले.

एसटीच्या सांगली विभागातील दहा आगारातून रोज ४०३ बसेसच्या फेऱ्या होत होत्या. शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन असल्यामुळे घरातून कोणीही बाहेर पडणार नाही. अत्यावशक गोष्टी वगळून बाहेर पडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. या दोन दिवसांत ग्रामीण भागातून औषधोपचारासाठी शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी बसची व्यवस्था व्हावी, म्हणून दहा आगारांतून ४६ बसेस सोडण्यात येणार आहेत. विटा, जत, आटपाडी, शिराळा, कडेगाव, पलूस आदी मार्गावर दर दोन तासाला बसेस सोडण्याचे नियोजन आहे, असेही वाघाटे यांनी सांगितले.

चौकट

हॉटेल बंद असल्यामुळे चालक, वाहकांची जेवणाची गैरसोय

राज्य शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिक, औरंगाबाद, पुणे मार्गावर बसेस घेऊन जाणाऱ्या चालक, वाहकांच्या जेवणाची गैरसोय होत आहे. याबद्दल चालक, वाहकांनी एसटी कामगार सेनेचे विलास यादव यांच्याकडे शुक्रवारी तक्रार केली. यादव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या चालक, वाहकांची गैरसोय टाळण्यासाठी बस घेऊन जाणाऱ्यांनाच पुन्हा परत आणण्यासाठी परवानगी द्यावी, म्हणजे त्यांच्या जेवणा, राहण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी मागणी केली.