शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३ वर्षांत ४४ मुलांचे अपहरण

By admin | Updated: January 26, 2015 00:37 IST

गतीने तपास : स्वतंत्र पोलीस पथकाची नियुक्ती; बेपत्तावरून गुन्हे दाखल

सचिन लाड / सांगलीजिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलांच्या प्रकरणात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. जिल्ह्यातील २४ पोलीस ठाण्यात आतापर्यंत ४४ मुलांचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपहरण प्रकरणाचा तपास तातडीने होण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. गेल्या काही वर्षांत अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलांपेक्षा मुली बेपत्ता होण्याची संख्या मोठी आहे. काही मुले अभ्यास न केल्याने, आई, वडील रागावल्यामुळे बेपत्ता होतात. मुलींना लग्नाच्या आमिषाने पळविले जाते. मात्र सुरुवातीला ही मुले बेपत्ता असल्याची नोंद केली जाते. पोलिसांकडून या मुलांचे छायाचित्र व माहिती राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कळविली जाते. चार-आठ दिवस गतीने तपास केला जातो. परंतु कुठेच सुगावा लागत नसल्याचे लक्षात येताच पोलीस तपास थांबतो. त्यानंतर पालक स्वत: मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हे प्रयत्न अपुरे पडतात. मुले बेपत्ता होणे आणि ती न सापडणे, हा विषय पालकांच्यादृष्टीने चिंतेचा बनला आहे. पालक चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तपास अधिकारी फारशी दखल घेत नाहीत. काय कुठं सुगावा लागला का? असा पालकांनाच प्रश्न विचारतात.सहा महिन्यांतून एकदा पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून या मुलांचे काय झाले? ती सापडली का? याची पोलिसांकडून चौकशी केली जाते. यासंदर्भात जबाबही नोंदवून घेतला जातो. मुलांपेक्षा मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. तीन-तीन वर्षे होऊन गेली तरी, मुली सापडत नसल्याने पालकांना चिंता लागून राहिली आहे. त्यांचा पोलीस तपासावरील विश्वास उडून गेला आहे. पोलीस मात्र लग्नाच्या आमिषाने पळून गेली आहे, म्हणजे तिचं त्या मुलाबरोबर प्रेमप्रकरण होतं, आज ना उद्या ती येईल, असे सांगून पालकांना पिटाळून लावतात. यामुळे वर्षानुवर्षे या मुलींचा तपास लागत नाही. या मुली जिवंत आहे का नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पळवून नेणारे ‘आॅनरेकॉर्ड’लग्नाच्या आमिषाने मुलींना पळवून नेले जाते. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होते; मात्र मुलींना पळवून नेणारे तरुण बेपत्ता आहेत, म्हणून त्यांची तक्रार दाखल होताना दिसत नाही. तरुणांचे नातेवाईक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. यावरून त्यांना हा तरुण कुठे आहे, याची माहिती असावी, हे स्पष्ट होते. पोलिसांनी याचा विचार करून त्यादृष्टीने तपास करण्याची गरज आहे.पित्यांच्या डोळ्यात अश्रू!सहा महिन्यांतून एकदा पोलीस मुलींच्या पित्यांना जबाब घेण्यासाठी तपास करणारे पोलीस कर्मचारी ठाण्यात बोलावून घेतात. साहेबांसमोर त्यांना हजर करतात. त्यावेळी साहेब या पित्याला, काय झालं मुलीचं? याची चौकशी करतात. त्यावेळी पित्याच्या डोळ्यात अश्रू उभारत आहेत. ‘साहेब मी नाद सोडला आहे. मुलीला शोधताना मी कर्जबाजारी झालो आहे? आता तिला शोधा, नाही तर राहू दे’, असे उत्तर ते देतात. बेपत्तावरून आता अपहरणपूर्वी अल्पवयीन मुले घरातून निघून गेल्यानंतर पोलीस बेपत्ताची नोंद करून घेत होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून १ ते १७ वयोगटातील मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आली तर, पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याची नवीन नियमावली अमलात आली आहे. पूर्वी ज्या अल्पवयीन मुला-मुलींची बेपत्ताची नोंद आहे, यामध्ये आता पालकांना बोलावून त्यांची तक्रार घेऊन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत अपहरणाचे ४४ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये २४ मुली, तर २० मुलांचा समावेश आहे.