शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सभेवर ४० सदस्यांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST

सांगली : जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी गैरकारभार झाकण्यासाठीच दि. २१ रोजीची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचा हट्ट धरल्याचा ...

सांगली : जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी गैरकारभार झाकण्यासाठीच दि. २१ रोजीची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचा हट्ट धरल्याचा आरोप करून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ४० सदस्यांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. सभागृहात ठिय्या मारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सोलापूर, सातारा जिल्हा परिषदेच्या सभा ऑफलाईन होत असतील तर सांगलीत अडचण काय, असा सवाल या सदस्यांनी उपस्थित केला.

जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. कोरोनाचे कारण देत अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी सोमवारी होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी सर्व सदस्यांशी तसा पत्रव्यवहारही केला आहे. कोरे यांच्या ऑनलाईन सभेच्या भूमिकेला भाजपच्या सदस्यांनीच तीव्र शब्दात विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे संभाजी कचरे, अर्जुन पाटील, संजय पाटील, संजीव पाटील, काँग्रेसचे जितेंद्र पाटील, महादेव पाटील, भाजपचे अरुण राजमाने, अरुण बालटे, नितीन नवले, सरदार पाटील आदी ४० सदस्यांची ऑनलाईन बैठक शुक्रवारी झाली.

पदाधिकारी आणि काही अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने केलेला गैरकारभार झाकण्यासाठीच ते ऑनलाईन सभा घेत आहेत. सातारा, सोलापूर जिल्हा परिषद, महापालिका सभा ऑफलाईन होत आहेत. तेथील कोरोना रुग्णांची संख्या सांगली जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. सांगलीची रुग्णसंख्या कमी असतानाही ऑफलाईन सभा का घेतली जात नाही. सदस्यांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न चालू देणार नाही, असा इशारा अर्जुन पाटील, संभाजी कचरे यांनी दिला.

सर्वसाधारण सभा ऑफलाईनच झाली पाहिजे. अन्यथा सर्वपक्षीय ४० सदस्य ऑनलाईन सभेवर बहिष्कार घालतील. बहिष्कार घालून सर्व सदस्य सोमवार, दि. २१ रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेतील वसंतदादा पाटील सभागृहात ठिय्या मारतील, असेही पाटील, कचरे यांनी स्पष्ट केले.

चौकट

साहित्य, औषधे खरेदीत लाखोंचा घोटाळा

जिल्हा परिषदेत साहित्य, औषध खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष चालू झाले तरीही पुस्तके मिळाली नाहीत. अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु आहे. या सर्व प्रकरणांवर सदस्यांनी काही बोलू नये, यासाठीच ऑनलाईन सभा घेण्याचा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या सदस्यांनी केला.