शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मिरज कोविड रुग्णालयातील ३७ डॉक्टरांच्या साताऱ्याला बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:28 IST

सांगली : ऐन कोविड काळात मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३७ डॉक्टरांच्या बदल्या सातारा व सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाकडे केल्या आहेत. ...

सांगली : ऐन कोविड काळात मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३७ डॉक्टरांच्या बदल्या सातारा व सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाकडे केल्या आहेत. बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचेही आदेश आहेत. यामुळे कोरोना कामावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

वैद्यकीय शिक्षण व अैाषधी द्रव्य विभागाने सोमवारी संध्याकाळी बदल्यांचे आदेश काढले. बदल्या झालेल्यांत अनेक वरिष्ठ व कोविड उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या डॉक्टरांचा समावेश आहे. त्याशिवाय पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील नऊ व सोलापुरातील डाॅ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन डॉक्टरांनाही साताऱ्याला पाठविले आहे. मिरजेतील बदल्या झालेले सर्वच डॉक्टर कोविडमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. काही जण मिरजेत तर उर्वरित सांगली शासकीय रुग्णालयात काम करताहेत. सर्व जण सहयोगी आणि सहायक प्राध्यापक आहेत. सातारा वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापक म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. अधिष्ठात्यांनी त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी आदेशात म्हटले आहे.

चौकट

साताऱ्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय

साताऱ्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरू होतील. त्यासाठी विविध ५१० पदे भरली जाणार आहेत. महाविद्यालयाला मंजुरीसाठी एनएमसी (नॅशनल मेडिकल कौन्सिल) तर्फे लवकरच पाहणी होणार आहे. तोपर्यंत तत्काळ पदे भरणे शक्य नसल्याने मिरज, पुणे व सोलापुरातून डॉक्टरांना पाठविले आहे.

चौकट

एनएमसीच्या नियमानुसार एखादा डॉक्टर पाहणीवेळी महाविद्यालयात नियुक्ती दाखविल्यास पुढील वर्षभरापर्यंत त्याला अन्य महाविद्यालयात हजर होता येणार नाही. त्यामुळे मिरजेतून ३७ डॉक्टर्स साताऱ्याला हजर झाल्यास वर्षभरासाठी ते कागदोपत्री तेथेच राहतील. सातारा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गायकवाड मंगळवारी मिरजेत आले, आदेशानुसार डॉक्टरांना त्वरित कार्यमुक्त करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला, त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत डॉक्टरांना कार्यमुक्त करण्यात आले. तथापि, सध्यातरी ते मिरज व सांगली रुग्णालयातच काम करणार आहेत.

चौकट

मुंबई, कोल्हापुरातूनही बदल्या

अलीबाग येथील नव्या महाविद्यालयासाठी मुंबईतून तर सिंधुदुर्ग येथील महाविद्यालयासाठी कोल्हापुरातून डॉक्टर घेतले आहेत. अलीबागसाठी मुंबईतून ४१, पुण्यातून २ व नागपुरातून एक असे ४४ डॉक्टर घेतले आहेत. सिंधुदुर्गसाठी कोल्हापुरातून ३३, मिरजेतून सहा, लातुरातून एक व नांदेडमधून दोन असे ४४ डॉक्टर्स घेतले आहेत.