शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

जगतापांच्या ३२ कोटींचा फुगा फुटला

By admin | Updated: July 29, 2016 23:52 IST

विक्रम सावंत : आमदार-खासदारांच्या राजीनाम्याची मागणी

जत : आमदार विलासराव जगताप यांनी म्हैसाळ योजनेच्या कामासाठी ३२ कोटी रूपये आणले आहेत, म्हणून फसवी घोषणा केली होती. त्यांचा फुगा आता फुटला आहे. त्यांनी स्वत:च औचित्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करून शासनावर नाराजी व्यक्त केली आहे. औचित्याचा मुद्दा उपस्थित केला म्हणजे प्रश्न सुटत नाहीत. फसवी घोेषणा करून त्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदार व खासदार संजय पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केली आहे. २२ पैकी फक्त वीस कोटी रूपये आले आहेत. ही वीस कोटी रूपयांची मागणी आघाडी शासनाने केली होती. त्याची पूर्तता झाली आहे. उमदी (ता. जत) येथील पाणी संघर्ष समितीने उमदी ते सांगली पदयात्रा काढली. त्यावेळी ३२ कोटी रूपये मिळाले, म्हणून फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली. आमदार व खासदार यांचा सत्कारही करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात निधी आला नाही. या वीस कोटी रूपयांतून ठेकेदारांची थकीत बिले देण्यात आली. मात्र नवीन कोणतेच काम करण्यात आले नाही. परंतु आमदार विलासराव जगताप मात्र डांगोरा पिटत होते, असे सांगून विक्रम सावंत म्हणाले की, म्हैसाळ योजनेची पूर्तता व जत तालुक्याचे विभाजन या मुख्य प्रश्नावर येथील जनतेने भाजपला मतदान केले होते. परंतु मागील दोन वर्षात यातील एकही प्रश्न सुटला नाही. जगताप यांना तालुक्यातील रस्त्यांच्या कामात जादा रस आहे. रस्त्यांसाठी आलेले ७२ कोटी रूपये हे आघाडी शासनाच्या कालावधीतील प्रस्ताव होते. त्याची पूर्तता फक्त आता झाली आहे. आमदारांचे समर्थक कार्यकर्ते एस.आर.ई.सी.एस.ची सर्वच कामे यंत्रामार्फत करत आहेत. यासंदर्भात तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. राजकीय दबावाखाली तक्रार दाबून ठेवली जात आहे. आसंगी (जत) ते गुड्डापूर रस्त्यावर वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून माती नालाबांध घालण्यात आला आहे. भाजप आमदार समर्थक कार्यकर्ते पंचायत समितीमध्ये एजंट म्हणून काम करत आहेत. पं. स.कडील सर्वच कामांची चौकशी झाल्यास त्यातील गौडबंगाल बाहेर पडणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जनतेच्या प्रश्नासाठी ते आमदार म्हणून काम करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत दौऱ्यात मुख्य प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात प्रश्न सुटले नाहीत. त्यांचे आश्वासन हे केवळ आश्वासनच राहिले आहे. जत येथे दोन महिन्यात तीन पोलिस निरीक्षक झाले आहेत. तालुका विभाजनाचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला नाही. जनावरांचा गोठा मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांकडून प्रत्येकी पाच ते दहा हजार रूपये घेतले जात आहेत, असा आरोपही यावेळी करण्यात आला. बाबासाहेब कोडग, आप्पू बिराजदार, पी. एम. पाटील, सुजय शिंदे, योगेश व्हनमाने, अ‍ॅड. बाळ निकम, संतोष भोसले आदी उपस्थित होते. (वार्ताहर)