शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

जिल्ह्यामध्ये २२,८४७ टीसीएम पाणीसाठा

By admin | Updated: August 24, 2016 23:44 IST

दुष्काळातून जलसंवर्धनाकडे : शेतकऱ्यांना फायदा

अशोक डोंबाळे --सांगली --जिल्ह्यात या वर्षात जलयुक्त शिवार अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून १४१ गावांमध्ये पाझर तलाव, सिमेंट बंधारे, तलावातील गाळ काढणे, ओढे-नदीचे रूंदीकरण आदी ४०८१ कामे झाली आहेत. या कामांवर ६९ कोटी ९४ लाखांचा निधी खर्च झाला आहे. जून, जुलै, आॅगस्टमधील पावसामुळे तलाव, बंधाऱ्यांमध्ये २२ हजार ८४७.२२ टीसीएम पाणीसाठा झाला आहे. त्यातून २२ हजार ५४५.०७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे.दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने पावसाचे पाणी गावामध्येच अडविण्यासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान’ ही महत्त्वपूर्ण योजना आखली आहे. यासाठी जिल्ह्यातील १४१ गावांची निवड केली होती. या गावांमध्ये सिमेंट बंधारे, पाझर तलाव, जुन्या पाझर तलावांमधील गाळ काढणे अशी चार हजार ८१ कामे पूर्ण झाली. या कामांसाठी शासनाने १४३ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी जलसंधारणाच्या कामावर ६९ कोटी ९४ लाखांचा खर्च झाला आहे. याशिवाय, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही जलसंधारणाची कामे झाली. लोकसहभाग आणि शासनाच्या मदतीतून जत, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, कडेगाव या तालुक्यांमध्ये ७४९ विहिरीमधील गाळ काढण्यात यश आले आहे. चाळीस ते पन्नास वर्षांत अनेक विहिरींमधील गाळही काढला नव्हता. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या विहिरीतील गाळ काढण्यात प्रशासनास यश आल्यामुळे पाणीसाठा झाला आहे. विहिरीतील गाळ काढण्यावर नऊ कोटी २१ लाखांचा निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात मोठ्याप्रमाणात जलसंधारणाची कामे झाल्यामुळे तेथे मोठ्याप्रमाणात पाणीसाठा झाल्याचे दिसून येत आहे. काही कामांचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे वळवाच्या पहिल्या पावसातच बंधाऱ्यांना गळती लागली आहे. मात्र काही निकृष्ट कामे सोडली तर, अग्रणी नदीवरील बेणापूर (ता. खानापूर) येथील सिमेंट बंधाऱ्यांची कामे पाहण्यासारखी आहेत. बहुतांशी सिमेंट बंधारे पाण्याने तुडूंब भरले आहेत. खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही बंधारे मान्सूनच्या पावसामुळे भरले आहेत. जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या बंधाऱ्यांसह तलावामध्ये २२ हजार ८४५ टीसीएम (हजार चौरस मीटर) पाणीसाठा झाला आहे.लोकसहभागही वाढला : लाखो रूपयांची कामेवाळवा व शिराळा तालुक्यातील तीस वर्षापूर्वीच्या तिळगंगा नदीचे सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार यांच्या प्रयत्नातून पुनरुज्जीवन झाले. नदी पात्रातील पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधले असून, त्यास ‘कर्मयोगी बाबासाहेब आमटे स्मृती बंधारा’ असे नावही देण्यात आले. यासह कुंडल येथेही अ‍ॅड्. दीपक लाड आणि त्यांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून ओढ्याचे पुनरुज्जीवन केले. हे उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत.जलयुक्त शिवार योजनेतील पूर्ण झालेली कामेतालुकागावांची संख्यापूर्ण कामेआटपाडी३०६०२कडेगाव९४१२क़ महांकाळ८१८१खानापूर१५६२९जत४२११९३तासगाव२४४९७मिरज१३७६२एकूण१४१४२७६जलयुक्त शिवार योजनेतून खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या अग्रणी नदीचे प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने पुनरुज्जीवन केले. अनेक सिमेंट बंधारे बांधले असून, तेथे मुबलक पाणीसाठा झाला आहे. जत, आटपाडीसह दुष्काळी तालुक्यातही जलसंधारणाची चांगली कामे झाली आहेत. पाणीसाठा झाल्यामुळे सिंचन क्षेत्रही वाढले आहे. - सुचिता भिकाणे, उपजिल्हाधिकारी, सांगली.