शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाड ड्रेनेज प्रकल्पाचा २१३ कोटींचा आराखडा सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST

सांगली : बहुचर्चित कुपवाड ड्रेनेज योजनेचा प्रकल्प अहवाल बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेकडे सादर केला. योजनेवर २१३ कोटींचा खर्च ...

सांगली : बहुचर्चित कुपवाड ड्रेनेज योजनेचा प्रकल्प अहवाल बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेकडे सादर केला. योजनेवर २१३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. येत्या महासभेत प्रकल्प आराखडा मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. त्यानंतर तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल, असे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

सूर्यवंशी म्हणाले, महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कुपवाड ड्रेनेज योजनेला खऱ्या अर्थाने गती आली. पालकमंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व आघाडीतील नेत्यांच्या उपस्थितीत २५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत कुपवाड ड्रेनेज योजनेवर चर्चा होऊन प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मिरज ड्रेनेज योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याने कुपवाड ड्रेनेज योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेसाठी २१३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात पाईपलाईनची एकूण लांबी २७० किलोमीटर आहे.

कुपवाड ड्रेनेजसाठी नगरोत्थान योजना, जलशक्ती अभियान, अमृत योजनेतून निधीसाठी पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. येत्या महासभेत प्रकल्प आराखड्याला मान्यता घेतली जाईल. या योजनेची तांत्रिक तपासणी मंडळ कार्यालयाकडून होईल. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता यांच्याकडे तांत्रिक मंजुरीसाठी सादर होणार आहे. ही योजना २०२३ मध्ये कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचेही सूर्यवंशी म्हणाले.

यावेळी उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक विष्णू माने, संतोष पाटील, जीवन प्राधिकरणाचे अधिकारी ए. ए. पाटील उपस्थित होते.

चौकट

सांगली-मिरजेतील वंचित भागाचा समावेश

सांगली व मिरज शहरासाठी स्वतंत्र ड्रेनेज योजनेचे काम सुरू आहे. या योजनेत आरवाडे पार्क, अभयनगर, मिरजेतील कोल्हापूर रोड परिसरातील अनेक नागरी वस्तींचा समावेश केलेला नव्हता. कुपवाडच्या आराखड्यात या वंचित भागाचाही समावेश करण्यात आला आहे. या भागात ३१ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकली जाणार आहे. त्यासाठी अंदाजे खर्च १५ कोटी रुपये अपेक्षित असल्याचे महापौर सूर्यवंशी म्हणाले.

चौकट

योजनेची वैशिष्ट्ये

* कुपवाड ड्रेनेज योजना : २१३ कोटी रुपये

* एकूण पाईपलाईन : २७० कि.मी.

* संप व पंपगृह : अहिल्यानगर, तुळजाईनगर, कुंभारमळा येथे.

* मलशुद्धीकरण केंद्र : कुंभारमळा (वानलेसवाडी)

* प्रक्रिया केलेल्या पाण्याची विल्हेवाट : मिरज-कोल्हापूर रस्त्याजवळील ओढ्यातून सोडले जाणार