शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’च्या कामांसाठी २0१७ ची ‘डेडलाईन’

By admin | Updated: May 17, 2016 01:47 IST

मुंबईत बैठक : निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री

सांगली : टेंभू उपसा जलसिंचन योजनेची प्रस्तावित कामे मार्च २0१७ पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. उर्वरित कामे करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. टेंभूच्या उर्वरित कामांमधील अडचणींवर चर्चा करण्यासाठी मुंबईच्या सह्याद्री अतिथिगृहात सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी खासदार संजय पाटील, आ. गणपतराव देशमुख व सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकरी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, टेंभू योजनेवर आजअखेर एक हजार ९३५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. २0१६-१७ साठी ८0 कोटींची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. टप्पा क्र. १ (अ), १ (ब), ३ (अ), ३ (ब) पूर्णपणे कार्यान्वित करणे बाकी आहे. टप्पा क्र. ४ आणि ५ ची उर्वरित कामेही पूर्ण करावीत. मुख्य कालव्याची ६५ किलोमीटर लांबी पूर्ण करण्यासाठी नियोजन झाले आहे. टेंभू येथे कृष्णा नदीवर धरण बांधून कृष्णा नदीतील पाणी पाच वेगवेगळ्या टप्प्यांद्वारे उचलून, सातारा जिल्ह्यातील ६00 हेक्टर, सांगली जिल्ह्यातील ५९ हजार ८७२ हेक्टर आणि सोलापूर जिल्ह्यातील २0 हजार हेक्टर, अशा एकूण ८0 हजार ४७२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेअंतर्गत ३५0 किलोमीटरचे कालवे असून, २0८ किलोमीटरपर्यंतची कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेचा लाभ सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील २१३ गावांना झाला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी कार्यकारी संचालक एम. व्ही. पानसे, मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, कार्यकारी अभियंता अ. ल. नाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)या कामांना मंजुरीमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सुरुवातीला टेंभू योजनेअंतर्गत असलेली इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल कामे प्राधान्याने केली जातील. त्यासाठी ३0 कोटी रुपयांची तजवीज केली आहे. यातून पंप, मोटारी व अन्य बंद पडलेली यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर उर्वरित निधीतून प्राधान्याने मुख्य कालव्यांची कामे करायची आहेत. त्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी २0१७ पर्यंतची मुदत दिली आहे.शेतकऱ्यांकडून दुष्काळी मदत सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी जमविलेल्या एक लाखाच्या निधीचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.