शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वाटपात २00 कोटींची भर

By admin | Updated: October 22, 2015 00:52 IST

नव्या धोरणाचा परिणाम : पीक कर्जात १0१ कोटींची वाढ

सांगली : जिल्हा बँकेने २0१६-१७ या आर्थिक वर्षात पीक कर्जांच्या मर्यादेत वाढ केल्यामुळे कर्ज वाटपात एकूण १९७ कोटी ८६ लाख ९१ हजार रुपयांची भर पडणार आहे. गतवर्षाच्या पीककर्ज वाटपाच्या आकडेवारीवरून हा अंदाज काढण्यात आला असल्याने, यात आणखी वाढ होऊ शकते. चालू वर्षाच्या तुलनेत २0१६-१७ साठीच्या कर्जमर्यादेत मोठी वाढ केली आहे. अनेक पिकांच्या कर्ज मर्यादेत दुप्पट, दीडपट वाढ झाली आहे. ज्या पिकांचा समावेश कर्जवाटप धोरणात नव्हता, त्या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीला प्रोत्साहन व बळ देण्याचा प्रयत्न या योजनांच्या माध्यमातून होणार आहे. पिकांच्या यादीत वाढ झाली असून पुढील आर्थिक वर्षापासून झेंडू, शेवगा, संत्री, मोसंबी या पिकांनाही बँक कर्जपुरवठा करणार आहे. वाहन कर्जाच्या मर्यादेतही मोठी वाढ केली आहे. एकूण कर्ज वाटपात उसाचे कर्ज ६५ टक्के, द्राक्षासाठी ३१ टक्के, तर उर्वरित कर्जवाटप अन्य पिकांसाठी केले जाते. उसाला यापूर्वी आडसाली, लागण, खोडवा, निडवा अशा पीक पद्धतीवर कर्जाची मर्यादा आखून दिली होती. संपर्क अभियानात शेतकऱ्यांनी गटनिहाय कर्जमर्यादेबद्दल तक्रारी केल्या. पिकाची पद्धत न पाहता उसाला सरसकट कर्जमर्यादा निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हेक्टरी १ लाख २५ हजार कर्ज दिले जाणार आहे. त्यामुळे उसाच्या माध्यमातून आगामी वर्षात १0१ कोटी ५७ लाख ५६ हजार रुपये वाढ होणार आहे. सध्या निर्यातक्षम द्राक्षांसाठी २ लाख २५ हजार, तर सर्वसाधारण द्राक्षासाठी २ लाख रुपये हेक्टरी कर्जवाटप केले जात होते. आता निर्यातक्षम द्र्राक्षासाठी ३ लाख २५ हजार, तर सर्वसाधारण द्राक्षासाठी ३ लाख रुपये हेक्टरी कर्जवाटप केले जाणार आहे. त्यामुळे द्राक्ष व इतर फळांच्या माध्यमातून आगामी वर्षात ९२ कोटी २६ लाख ४८ हजार रुपयांची वाढ शक्य आहे. चालू वर्षांच्या आकडेवारीवर वाढीचे गणित आखण्यात आले आहे. यात आणखी वाढ झाली, तर अडीचशे कोटींच्या वाढीचीही चिन्हे आहेत. कर्जवाटपात वाढ झाल्याने बँकेच्या उत्पन्नातही मोठी वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)