शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील १८९ कैदी सांगली कारागृहात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 00:47 IST

खटले न्यायप्रविष्ट : गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सचिन लाड --सांगली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात ‘खून का बदला खून’ या रागातून अनेकांचे मुडदे पाडण्यात आले. अनैतिक संबंध, जमिनीचा वाद, पूर्ववैमनस्य, प्रेमप्रकरण व किरकोळ कारणातून हे खून झाले. या खुनांतील तब्बल १८९ कैदी सांगली कारागृहात न्यायालयीन निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये १८४ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे कारागृहाने क्षमता ओलांडली आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना पोलिस व कारागृह प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे. सांगलीचे कारागृह २३५ कैद्यांच्या क्षमतेचे आहे. यामध्ये २०५ पुरुष व ३० महिलांना ठेवता येते. पण गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील गुन्हेगारीत वाढच होत राहिल्याने कारागृहात कैद्यांची संख्या वाढत गेली. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, दरोडा, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांतील कैदी येथे आहेत. विशेषत: खुनाच्या गुन्ह्यांतील कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कैद्यांची संख्या वाढत असताना, त्या तुलनेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना डोळ्यात तेल घालून त्यांना काम करावे लागत आहे. रविवारअखेर तब्बल ३९० कैदी होते. गेल्या चार-पाच वर्षात पहिल्यांदाच कैद्यांची संख्या एवढी झाली आहे. दोन-चार कैदी जामिनावर बाहेर पडत असले तरी, तेवढेच नव्याने आत येतात. त्यामुळे कैद्यांच्या या संख्येत नेहमीच चढ-उतार होत राहिला आहे.खुनातील १८९ कैदी आहेत. काहींनी जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यांना जामीन मिळाला नाही. पंधरवड्यातून एकदा त्यांना न्यायालयात उभे केले जाते. त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले आहे. काहींनी जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यांना जामीन मिळाला नाही. पंधरवड्यातून एकदा त्यांना न्यायालयात उभे केले जाते. खटले न्यायप्रविष्ट असले तरी, निकाल कधी लागतो, याची त्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. संजयनगरमधील मनोज कदम याचा खून केल्याप्रकरणी गुंड म्हमद्या नदाफसह २४ जणांना अटक करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व संशयितांना कोल्हापुरातील कळंबा कारागृहात ठेवले आहे. ते येथे असते तर खुनांतील कैद्यांची संख्या दोनशेवर गेली असती. तसेच जिल्हा परिषदेच्या पेपर फुटीतील २४ संशयितांना जामीन मिळाला आहे. तेही सर्वजण येथे असते, तर कैद्यांची संख्या साडेचारशेपर्यंत गेली असती. मे महिन्यात १६ खूनजिल्ह्यात मे महिन्यात तब्बल १६ खून झाले. या खुनातून ५० ते ५५ नवीन संशयित रेकॉर्डवर आले. तेही सध्या कारागृहात आहेत. खुनातील कैद्यांची संख्या वाढण्यास हे कारणही आहे. गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहिले, तर कैद्यांना ठेवण्यासाठी सांगलीचे कारागृह अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे कारागृह कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळावर हलविण्याचा निर्णय योग्य आहे. तत्कालीन कारागृह अधीक्षकांनी या जागेसाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर तो शासनाकडे गेला आहे.