शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

सुंदरीची १७ तास मृत्यूशी झुंज व्यर्थ!

By admin | Updated: May 24, 2016 00:52 IST

कुत्र्यांचा हल्ला : आईचा आक्रोश; पालिकेच्या कारभाराविरुद्ध संताप

सांगली : मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या सुंदरी परतेश भारती (वय ६ वर्षे, रा. सरस्वती कॉलनी, सांगली) या बालिकेचा रविवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. तब्बल १७ तास तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. पण प्रचंड रक्तस्त्राव झाला असल्याने तिची झुंज व्यर्थ ठरली अन् तिची प्राणज्योत मालवली. चिमुरडीच्या या मृत्यूबद्दल सांगलीकरांनी हळहळ व्यक्त केली. महापालिकेच्या कारभाराविरुद्ध संताप व्यक्त करुन मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.सुंदरी भारती हिचे कुटुंब उत्तर प्रदेश राज्यातील नारायणपूर गावचे आहे. उदरनिर्वाहासाठी हे कुटुंब सांगलीत स्थायिक झाले आहे. सुंदरीचे वडील सेंट्रींग कामावर जातात. हे कुटुंब उद्योग भवनच्या पिछाडीस सरस्वती कॉलनीत राहते. सुंदरी रविवारी सकाळी भावासोबत कॉलनीपासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे रुळाजवळील खड्ड्यात प्रातर्विधीसाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर सात ते आठ मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता. हा प्रकार पाहून तिचा भाऊ भीतीने पळून गेला होता. तेथील नागरिकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. कुत्र्यांनी तिच्या शरीराचे २५ ठिकाणी लचके तोडल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. तिची मृत्यूशी झुंज सुरु होती. सायंकाळनंतर सुंदरीची प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्याने तिला अतिदक्षता विभागात हलविले होते. आई, वडील, दोन भावंडे तिच्या उशाला बसून होती. सुंदरी रुग्णालयात दाखल झाल्यापासून निपचित पडली होती. ती आता उठेल, मग उठेल, या आशेने आई तिच्याकडे डोळे लावून बसली होती. रुग्णालयातील डॉक्टरांनीही तिच्यावर उपचार करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. वडील सातत्याने डॉक्टरांना हात जोडून उभे होते. मुलगी यातून वाचावी, यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थनाही केली. मात्र रात्री पावणेबाराला तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)मदत मिळाली असती तर..?रेल्वे रुळाजवळ सकाळी फारशी वर्दळ नसते. सात ते आठ कुत्र्यांनी सुंदरीवर हल्ला केल्याने, तिचा प्रतिकार कुचकामी ठरला. शरीराचा कोणताही भाग सुरक्षित नव्हता. सगळीकडे लचके तोडलेल्या जखमा होत्या. लोक तिच्या मदतीला तातडीने धावून आले असते, तर कदाचित सुंदरी बचावली असती. तिला मदत मिळाली, पण फार उशिरा. त्यामुळे ती जगेल का नाही, याची सुरुवातीपासून साऱ्यांनाच शंका होती. अखेर ही शंका खरी ठरली.