शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शिरसगावात कोरोनाचे १०७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : शिरसगाव (ता. कडेगाव) येथे कोरोनाचा कहर सुरू आहे. १८०० लोकवस्तीच्या आणि ३८० कुटुंबे असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : शिरसगाव (ता. कडेगाव) येथे कोरोनाचा कहर सुरू आहे. १८०० लोकवस्तीच्या आणि ३८० कुटुंबे असलेल्या या गावात गेल्या काही दिवसांत १०७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाला येथे युद्धपातळीवर चाचण्या कराव्या लागत आहेत. गावातील चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या गावातील सर्दी, खोकल्याची लक्षणे असलेल्या काही संशयितांनी निष्काळजीपणा केला. रुग्णालयात

लवकर उपचार घेतले नाहीत. त्याचा अनेकांना फटका बसला. गावात बुधवारी एकाच दिवशी कोरोनाचे १२ रुग्ण आढळून आले. प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड व तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी गावास भेट देऊन सरपंच सुप्रिया मांडके व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत दक्षता समितीची बैठकही घेतली. येथे प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. चिंचणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पौर्णिमा शृंगारपुरे व मोहित्यांचे वडगाव आरोग्य केंद्राचे डॉ. सागर जाधव, डॉ. प्रवीण माळी यांनी येथील २७५ लोकांच्या कोरोना चाचण्या घेतल्या आहेत. परिचारिका स्नेहा सूर्यवंशी, आशा स्वयंसेविका नीता धर्माधिकारी आणि तेजस्विनी पवार रुग्णांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेत आहेत. कोरोना रुग्णांना चिंचणी व कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू झालेल्या कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविले जात आहे. सौम्य लक्षणाच्या रुग्णांना चिंचणी येथील शासकीय वसतिगृहात सुरू झालेल्या कोविड केअर सेंटरमध्ये किंवा गृह विलगीकरण कक्षात पाठविले जात आहे.

चौकट

माजी सरपंचांकडून दिलासा

शिरसगावचे माजी सरपंच सतीश मांडके संशयित कोरोना रुग्णांना रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करीत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना बेड उपलब्ध करून घेऊन रुग्णवाहिकेबरोबर स्वतःच्या गाडीने कऱ्हाड व सांगली येथे जाऊन रुग्णांना व नातेवाईक यांना दिलासा देत आहेत.