शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू, ताकारी, म्हैसाळला हवेत १००० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST

ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या कामाची सुरुवात १९८३ मध्ये, तर टेंभू योजनेच्या कामाची सुरुवात १९९५ मध्ये युती सरकारच्या ...

ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या कामाची सुरुवात १९८३ मध्ये, तर टेंभू योजनेच्या कामाची सुरुवात १९९५ मध्ये युती सरकारच्या कालावधीत झाली. ताकारी-म्हैसाळ योजनांची कामे सुरू होऊन ३७ वर्षे, तर टेंभूला २६ वर्षे झाली आहेत. तरीही तिन्ही योजनांची कामे शंभर टक्के पूर्ण झालेली नाहीत. आजही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत थेट पाणी जात नाही. मुख्य कालव्याची कामे पूर्ण झाल्यामुळे दुष्काळी कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, जत, खानापूर, मिरज पूर्व तालुक्यातील सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळत आहे, असा पाटबंधारे विभागाचा दावा आहे. ओढे, नाल्यांद्वारेच तलाव भरून दिले जात आहेत. पोट कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. सध्या बंदिस्त जलवाहिनीद्वारे थेट पाझर तलाव, शेत तलावामध्ये पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाचे नियोजन आहे.

टेंभू योजनेच्या अपूर्ण कामांसाठी ४०० कोटी, तर ताकारी-म्हैसाळ योजनेसाठी ६०० कोटी अशा एक हजार कोटींच्या निधीची गरज आहे. यापैकी सध्या तातडीने टेंभूसाठी ३०० कोटी आणि ताकारी-म्हैसाळ योजनांसाठी ३५० कोटीची गरज आहे. या निधीची पाटबंधारे विभागाने राज्य शासनाकडे मागणी केली आहे.

कोट

म्हैसाळ योजनेची कामे शासनाने तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. नियमित पाणी मिळेल याची खात्री झाल्याशिवाय बागायती पीक घेता येत नाही. पोट कालव्यांची कामेही पूर्ण झाली पाहिजेत.

-महादेव पाटील, शेतकरी.

कोट

टेंभू योजनेच्या मुख्य कालव्याचेही काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. कालव्याचे अस्तरीकरण केलेले नाही. पोट कालव्यांची कामे तर कोठेच झालेली नाहीत. अपूर्ण कामे पूर्ण करून शासनाने दुष्काळी भागाला दिलासा द्यावा.

-सतीश मंडले, शेतकरी.

कोट

जिल्ह्यातील सिंचन योजनांची कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली आहेत. शासनाने पाणी सोडण्याची आणि पाणीपट्टी वसुलीची यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. वसूल करण्यात येणाऱ्या पाणीपट्टीच्या पैशाचा हिशेबही शेतकऱ्यांना द्यावा.

-सुरेश पाटील, शेतकरी.

कोट

टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांच्या अपूर्ण कामांसाठी शासनाकडे साडेसहाशे कोटींची मागणी केली आहे. सध्या टेंभूचे १० टक्के तर ताकारी-म्हैसाळ योजनेचे १५ टक्के काम अपूर्ण आहे. येत्या वर्षभरात सर्व अपूर्ण कामे पूर्ण होतील.

-मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ.