शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवन मिशनसाठी १० टक्के लोकवर्गणीची अट शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST

सांगली : जलजीवन मिशनसाठी १० टक्के लोकवर्गणीची अट शिथिल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. त्याऐवजी ही रक्कम ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून ...

सांगली : जलजीवन मिशनसाठी १० टक्के लोकवर्गणीची अट शिथिल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. त्याऐवजी ही रक्कम ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून वर्ग करावी असाही निर्णय झाला. जलव्यवस्थापन समितीतर्फे तो शासनाकडे पाठविला जाणार आहे.

समितीच्या सभेत याविषयी चर्चा झाली. जलजीवन मिशनअंतर्गत अनेक गावांसाठी पाणीयोजना राबविण्यात येत आहेत; पण त्यामध्ये लोकवर्गणीची अट अडथळा ठरत आहे. त्यामुळे ही रक्कम ग्रामनिधीतून वळती करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागण्यात आली. पाझर, तलाव, मातीचे नालाबांध या कामात एखाद्या शेतकऱ्यांची जमीन, विहीर किंवा अन्य पाणीस्रोत गेल्यास त्याला संबंधित पाझर तलाव किंवा नालाबांधमधून पाणी घेण्यास परवानगी देण्याचेही ठरले. देवर्डे येथे नवा बंधारा व कुरळप येथे बंधाऱ्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ऐतवडे व कामेरी येथे ठेकेदाराने अर्धवट केलेली बंधाऱ्याची कामे तातडीने पूर्ण करून घेण्याचे आदेश देण्यात आले. म्हैसाळ (एम) (ता. कवठेमहांकाळ) येथे पाटील वस्तीवरील बंधाऱ्याचे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारीनंतर त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह सदस्य व अधिकारी बैठकीला उपस्थित होते.