Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > Cannes Festival 2026 : आलिया भट्टने खाल्लं 'हे' नॅचरल सुपरफूड! वजनदार कपडे - तासंतास रॅम्प वॉक, थकवा दूर ठेवणारा खास पदार्थ...

Cannes Festival 2026 : आलिया भट्टने खाल्लं 'हे' नॅचरल सुपरफूड! वजनदार कपडे - तासंतास रॅम्प वॉक, थकवा दूर ठेवणारा खास पदार्थ...

Alia Bhatt's Cannes Festival Diet Secret : Alia Bhatt Cannes diet healthy bowl before ramp walk : कान्स रेड कार्पेटवर उतरण्यापूर्वी आलिया भट्टने खाल्ला १ खास पदार्थ, देईल इन्स्टंट एनर्जी, अवघ्या ५ मिनिटांत खायला तयार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2026 14:00 IST2026-05-16T14:00:00+5:302026-05-16T14:00:02+5:30

Alia Bhatt's Cannes Festival Diet Secret : Alia Bhatt Cannes diet healthy bowl before ramp walk : कान्स रेड कार्पेटवर उतरण्यापूर्वी आलिया भट्टने खाल्ला १ खास पदार्थ, देईल इन्स्टंट एनर्जी, अवघ्या ५ मिनिटांत खायला तयार...

Alia Bhatt's Cannes Festival Diet Secret Alia Bhatt Cannes diet healthy bowl before ramp walk | Cannes Festival 2026 : आलिया भट्टने खाल्लं 'हे' नॅचरल सुपरफूड! वजनदार कपडे - तासंतास रॅम्प वॉक, थकवा दूर ठेवणारा खास पदार्थ...

Cannes Festival 2026 : आलिया भट्टने खाल्लं 'हे' नॅचरल सुपरफूड! वजनदार कपडे - तासंतास रॅम्प वॉक, थकवा दूर ठेवणारा खास पदार्थ...

सध्या जगभरात कान्स फेस्टिव्हलची जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रतिष्ठित फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकने रेड कार्पेटवर चालताना आपले लक्ष वेधून घेतात. या जागतिक मंचावर दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूड सुंदरींनी आपल्या फॅशनचा जलवा दाखवला आहे. यामध्ये सर्वांचे (Alia Bhatt Cannes Festival 2026) लक्ष वेधून घेतले ते म्हणजे बॉलिवूडची बार्बी गर्ल 'आलिया भट्ट'...अभिनेत्रीआलिया भट्ट हिच्या हटके फॅशन स्टाईल आणि आत्मविश्वासपूर्ण रॅम्प वॉकची सोशल मिडियावर विशेष चर्चा होत आहे. मात्र, या चमकदार लूकमागे आणि दिवसभर उत्साही राहण्यामागे तिच्या हेल्दी लाइफस्टाइलचाही मोठा वाटा आहे. आलियाने एकापेक्षा एक स्टायलिश आणि ग्लॅमरस आऊटफिट्स परिधान करून कान्सच्या रेड कार्पेटवर अतिशय दिमाखात रॅम्प वॉक केला. तिचे ते सौंदर्य, तो आत्मविश्वास आणि तिची ती थक्क करणारी एनर्जी पाहून सध्या सोशल मिडियावर तिचे प्रचंड कौतुक होत आहे(Alia Bhatt Cannes diet healthy bowl before ramp walk).

पण भरगच्च आणि वजनदार कपडे घालून तासंतास कॅमेऱ्यांसमोर वावरताना आलियाच्या चेहऱ्यावरचा तो फ्रेशनेस, ग्लो आणि एनर्जी नेमकी आली कुठून? रॅम्प वॉकच्या काहीवेळ आधी आलियाने थकवा दूर करण्यासाठी आणि शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळवण्यासाठी एक खास 'हेल्दी पदार्थ' खाल्ला होता. हा असा पदार्थ आहे (Alia Bhatt healthy food bowl) जो चवीला तर उत्तम आहेच, पण आरोग्यासाठी देखील एक सुपरफूड मानला जातो. हा हेल्दी पदार्थ नेमका कोणता आहे? तो घरच्या घरी कसा तयार करायचा? आणि तो खाल्ल्याने आपल्या (Alia Bhatt's Cannes Festival Diet Secret) आरोग्याला कोणते आश्चर्यकारक फायदे होतात? आलियाला इन्स्टंट एनर्जी देण्याऱ्या त्या खास रेसिपीचे सिक्रेट पाहूयात. 

आलियाला इन्स्टंट एनर्जी देणारा तो खास पदार्थ नेमका कोणता ? 

आलिया भट्टने कान्स २०२६ (Cannes Festival 2026) च्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवण्यापूर्वी जो पदार्थ खाल्ला, तो अतिशय साधा, हलका आणि आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. रेड कार्पेटवर उतरण्यापूर्वी, आलिया भट्टने एक वाटी फ्रेश दही आणि त्यावर स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरीसारखी ताजी बेरीज (Berries) टाकून त्याचा आनंद घेताना दिसली. आरोग्य आणि पोषणाच्या दृष्टीने विचार केला, तर हे एक अतिशय स्मार्ट आणि परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. हा पदार्थ बनवणे अतिशय सोपे आहे आणि यासाठी गॅस पेटवण्याचीही गरज नाही.

उन्हाळ्यात भरपूर पाणी पिऊनही लघवी कमी होते कारणं...५ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका - पाहा नेमकं काय बिघडतंय...

२१ दिवस पपई 'या' पद्धतीने खा! ढेरी होईल कमी, फॅटी लिव्हर आणि वेटलॉसही होईल झटपट, व्हाल सुपरफिट... 

एका बाऊलमध्ये १ कप ताजे आणि घट्ट दही घ्या. (तुम्ही पाण्याचा अंश कमी असलेले चक्का किंवा ग्रीक योगर्ट देखील वापरू शकता). त्यावर नीट धुवून घेतलेली ताजी बेरीज (जसे की स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी किंवा रास्पबेरी) आवडीनुसार बारीक चिरून टाका. जर तुम्हाला गोड आवडत असेल, तर वरून अर्धा चमचा मध घालू शकता. सर्व गोष्टी हलक्या हाताने मिक्स करा. तुमचा हाय-एनर्जी देणारा स्पेशल एनर्जी - हेल्दी बाऊल खाण्यासाठी तयार आहे. 

हा स्पेशल एनर्जी - हेल्दी बाऊल खाण्याचे फायदे... 

१. दही (Dahi) :- दह्यातील चांगल्या बॅक्टेरियांमुळे पचनशक्ती मजबूत होते आणि उन्हाळ्यात पोटाला थंडावा मिळतो.

२. ब्लूबेरी (Blueberry) :- यातील अँटीऑक्सिडंट्स मेंदूची कार्यक्षमता वाढवतात आणि शरीराला फ्री-रॅडिकल्सपासून वाचवतात.

३. रास्पबेरी (Raspberry) :- रास्पबेरी मध्ये हाय फायबर असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते.

४. ब्लॅकबेरी (Blackberry) :- ब्लॅकबेरी ही बेरी हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम असून शरीरातील सूज कमी करण्यास फायदेशीर ठरते.

५. स्ट्रॉबेरी (Strawberry) :- स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर व्हिटॅमिन 'सी' असते, जे त्वचेचा रंग उजळण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

हा इन्स्टंट एनर्जी देणारा एनर्जी बाऊल खाल्ल्याने, उन्हाळ्यात कडक उन्हामुळे येणारा थकवा आणि सुस्ती एका मिनिटात दूर होते. फायबर आणि प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते. दह्यातील लॅक्टिक ॲसिड आणि बेरीजमधील अँटीऑक्सिडंट्स एकत्र येऊन त्वचेला नैसर्गिक ग्लो देतात. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करून पाचनक्रिया शांत ठेवण्यासाठी हा एक उत्तम आणि हलका आहार आहे.


Web Title : आलिया भट्ट का कान 2026 आहार: रैंप वॉक ऊर्जा के लिए प्राकृतिक सुपरफूड!

Web Summary : आलिया भट्ट कान 2026 में रैंप वॉक से पहले दही और बेरीज का एक स्वस्थ कटोरा खाकर ऊर्जावान रहीं। यह सुपरफूड संयोजन तत्काल ऊर्जा प्रदान करता है, पाचन में मदद करता है, त्वचा को चमकदार रखता है, और भारी पोशाकों और लंबे घंटों से होने वाली थकान से लड़ता है।

Web Title : Alia Bhatt's Cannes 2026 Diet: Natural Superfood for Ramp Walk Energy!

Web Summary : Alia Bhatt stayed energetic at Cannes 2026 by eating a healthy bowl of yogurt and berries before her ramp walk. This superfood combination provides instant energy, aids digestion, and keeps skin glowing, combating fatigue from heavy outfits and long hours.