Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > २१ दिवस पपई 'या' पद्धतीने खा! ढेरी होईल कमी, फॅटी लिव्हर आणि वेटलॉसही होईल झटपट, व्हाल सुपरफिट...

२१ दिवस पपई 'या' पद्धतीने खा! ढेरी होईल कमी, फॅटी लिव्हर आणि वेटलॉसही होईल झटपट, व्हाल सुपरफिट...

eat papaya this way for 21 days to reduce belly fat & support liver health : how to eat papaya for weight loss : best time to eat papaya for weight loss : जिम आणि डाएटशिवाय वेटलॉस - पोटाची ढेरी होईल कमी, फक्त या पद्धतीने खा पपई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2026 15:02 IST2026-05-14T14:58:39+5:302026-05-14T15:02:12+5:30

eat papaya this way for 21 days to reduce belly fat & support liver health : how to eat papaya for weight loss : best time to eat papaya for weight loss : जिम आणि डाएटशिवाय वेटलॉस - पोटाची ढेरी होईल कमी, फक्त या पद्धतीने खा पपई...

eat papaya this way for 21 days to reduce belly fat & support liver health how to eat papaya for weight loss best time to eat papaya for weight loss | २१ दिवस पपई 'या' पद्धतीने खा! ढेरी होईल कमी, फॅटी लिव्हर आणि वेटलॉसही होईल झटपट, व्हाल सुपरफिट...

२१ दिवस पपई 'या' पद्धतीने खा! ढेरी होईल कमी, फॅटी लिव्हर आणि वेटलॉसही होईल झटपट, व्हाल सुपरफिट...

आजकालची धावपळीची आणि सतत बदलती लाईफस्टाईल आणि तासंतास एकाच जागी बसून राहण्यामुळे वजन वाढणे, विशेषतः पोट सुटणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. अनेक प्रयत्न करूनही सुटलेलं पोट आणि वजन काही केल्या कमी होत नाही, हेच वाढलेलं वजन कमी करणं अनेकांसाठी मोठं चॅलेंज बनलं आहे. जिम, डाएट आणि वेगवेगळे वेटलॉस प्लॅन्स फॉलो करूनही अनेकदा अपेक्षित परिणाम मिळत नाहीत तेव्हा आपला हिरमोड होतोच शिवाय आरोग्याचीही चिंता वाटू लागते. वाढलेल वजन आणि बाहेर आलेली पोटाची ढेरी हे केवळ दिसायलाच खराब दिसत नाही, तर ते फॅटी लिव्हरसारख्या आजारांचे लक्षणही असू शकते. कित्येकदा महागडे जिम, डाएट प्लॅन असं सगळं काटेकोरपणे करूनही वजन आणि पोटाची ढेरी कमीच होत नसेल तर नैसर्गिक आणि सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात(eat papaya this way for 21 days to reduce belly fat & support liver health).

योगगुरू दीपक शर्मा यांनी एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, जर तुमचे पोट बाहेर आलेले असेल, तर तुमचे लिव्हर फॅटी असण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही पपईचा तुमच्या आहारात समावेश केला तर खूप फायदा होऊ शकतो. 'पपई' हे अस एकच फळ आहे, जे कमी कॅलरी आणि भरपूर फायबरमुळे वेटलॉसमध्ये (how to eat papaya for weight loss) मदत करू शकतं. पचन सुधारण्यापासून पोट जास्त वेळ भरलेलं ठेवण्यापर्यंत पपईचे अनेक फायदे सांगितले जातात. विशेष म्हणजे योगगुरू दीपक शर्मा यांच्या सांगण्यानुसार, २१ दिवस ठराविक पद्धतीने पपईचा आहारात समावेश करून वजन अगदी सहज कमी करता येते. परंतु वेटलॉस आणि पोटाची ढेरी कमी करण्यासाठी पपई नेमकी कधी आणि कशी खावी, हे जाणून घेणंही (best time to eat papaya for weight loss) तितकंच महत्त्वाचं आहे. २१ दिवस पपई योग्य पद्धतीने खाल्ल्याने वेटलॉसमध्ये कशी मदत मिळू शकते ते पाहूयात. 

वेटलॉस आणि पोटाची ढेरी कमी करण्यासाठी पपई फायदेशीर... 

'पपई' हे असे एक फळ आहे ज्यामध्ये पाणी आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. या कारणामुळे पपई पोट साफ ठेवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते. जर तुम्ही सकस आहारासोबत पपई रोज खात असाल, तर पोट फुगणे आणि इन्फ्लेमेशन (दाह) कमी करण्यात फायदा मिळू शकतो. पपई खाल्ल्याने पोटही भरलेले राहते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही, ज्याचा परिणाम वेटलॉस आणि पोटाची ढेरी कमी करण्यात होतो. 

हार्दिक पांड्याची १ सवय ठेवते त्याला कायम फिट! पाहा रोज तो कोणते पदार्थ नियमित खातो...

पपई खाण्याची योग्य पद्धत... 

योगगुरू दीपक शर्मा सांगतात की, जर तुमच्या पोटाची ढेरी बाहेर आलेली असेल, तर आपल्याला फॅटी लिव्हर असण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत, आपल्या रोजच्या आहारात दररोज एक प्लेट पिकलेल्या पपईचा समावेश नक्कीच केला पाहिजे. पपई सोलून तिचे तुकडे करा आणि त्यावर थोडी काळीमिरी पूड भुरभुरवून खा. सलग २१ दिवस अशाच प्रकारे पपई खाल्ल्याने वेटलॉस आणि पोटाची ढेरी कमी करणे सहज शक्य होते. 

लालबूंद रसाळ कलिंगडावर १ चिमूटभर ‘ही’ गोष्ट घालून खा, पोट बिघडणे-उलट्या अपचनाचा धोका टळेल...

सकाळी की संध्याकाळी, कधी खाणे जास्त फायदेशीर आहे?

योगगुरू यांनी सांगितल्याप्रमाणे, जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी पपईचा आहारात समावेश केला, तर ते खूप जास्त फायदेशीर ठरते. यानंतर तुम्ही हलका-फुलकाच डिनर कराल, ज्यामुळे वजन कमी करण्यास मोठी मदत मिळते. यासोबतच, आपण आपल्या आहारात सोयीनुसार सकाळी नाश्त्यामध्ये किंवा दुपारी जेवणापूर्वी देखील एक प्लेट पपई खाऊ शकता.

जाडजूड मांड्या-पोटाचा घेर कमी करतो शेवग्याच्या पानांचा उपाय, वेटलॉससाठी शेवगा असरदार...

नॅचरल डिटॉक्समध्ये मदत करते... 

योगुरूंनी सांगितल्यानुसार, पपईवर थोडी काळीमिरी भुरभुरवून खाल्ल्याने शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यास मदत मिळते. यामुळे लिव्हर देखील निरोगी राहते आणि चरबी हळूहळू कमी होऊ लागते. मात्र लक्षात ठेवा की, पपई खाल्ल्यानंतर लगेच पचायला जड किंवा तळलेले-भाजलेले पदार्थ खाऊ नका. प्रयत्न करा की ३० मिनिटांपर्यंत इतर काही न खाता फक्त पाणी पिऊ शकता. 

या गोष्टींचीही काळजी घ्या... 

फक्त पपई खाल्ल्यानेच फरक दिसणार नाही. त्यासोबत तुम्हाला तुमच्या उर्वरित आहारावर आणि लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करणे देखील आवश्यक आहे. प्रयत्न करा की २१ दिवसांपर्यंत हलके-फुलके जेवण जसे की डाळ-भात, चपाती किंवा खिचडी यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. सोबतच कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल आपल्या दिनचर्येत समाविष्ट करा. व्यायामासाठी वेळ नसेल, तर काही वेळ विशेषतः जेवण झाल्यानंतर वॉकिंग नक्की  करा.

Web Title : 21 दिन पपीता खाएं: पेट की चर्बी, फैटी लिवर कम करें।

Web Summary : योग गुरु के अनुसार 21 दिनों तक पपीता खाने से पेट की चर्बी कम होती है और लिवर स्वस्थ रहता है। पपीता पाचन में मदद करता है, पेट भरा रखता है, और वजन घटाने में सहायक है। सर्वोत्तम परिणामों के लिए शाम को काले मिर्च के साथ एक प्लेट पपीता खाएं।

Web Title : Eat papaya for 21 days: Reduce belly fat, fatty liver.

Web Summary : Yoga guru suggests eating papaya for 21 days to reduce belly fat and support liver health. Papaya aids digestion, promotes fullness, and helps in weight loss. Eat a plate of papaya with black pepper in the evening for best results.