भारतीय क्रिकेट संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आपल्या दमदार खेळासोबतच फिटनेससाठीही कायम चर्चेत असतो. मैदानावरची त्याची एनर्जी, अॅक्टिव्हनेस आणि फिट बॉडी पाहून अनेकजण त्याच्या फिटनेस सिक्रेटबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. बिझी डेली रुटीन, सततचा प्रवास आणि कठीण सराव असूनही हार्दिक स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपल्या मॉर्निंग रुटीनला खूप महत्त्व देतो. विशेष म्हणजे सकाळी उठल्यानंतर तो सर्वात आधी आपले मॉर्निंग रुटीन न चुकता कायम लक्ष देत बारकाईने फॉलो करतोच. यासोबतच तो संतुलित आहार, नियमित वर्कआऊट आणि शिस्तबद्ध लाईफस्टाईल फॉलो करतो. त्याच्या या काही साध्यासोप्या पण आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या सवयीच त्याला कायम फिट आणि एनर्जेटिक ठेवण्यास मदत करतात(how many liters of water does Hardik Pandya drink).
हार्दिकची मैदानावरील चपळता आणि ताकद पाहून अनेकदा प्रश्न पडतो की, हार्दिक स्वतःला इतकं 'सुपरफिट' कसं ठेवतो? फक्त तासंतास जिममध्ये घाम गाळून अशी शरीरयष्टी मिळत नाही, तर त्यामागे आहे त्याचे बेस्ट मॉर्निंग रुटीन (Hardik Pandya fitness secrets) आणि त्याला फिट ठेवणाऱ्या काही खास सवयी... हार्दिकच्या मॉर्निंग रुटीनमधील कोणती (Hardik Pandya hydration routine) खास सवय त्याला इतकं फिट ठेवते ते पाहूयात.
हार्दिकच्या मॉर्निंग रुटीनमधील 'ती' खास सवय कोणती ?
हार्दिक पंड्या हा केवळ एक क्रिकेटपटू नसून तो आजच्या तरुणाईसाठी एक 'फिटनेस आयकॉन' आहे. अनेकांना प्रश्न पडतो की, हार्दिक इतका फिट आणि चपळ कसा राहतो? तर त्याचे सिक्रेट लपलं आहे त्याच्या मॉर्निंग रुटीनमधील एका साध्या पण अत्यंत फायदेशीर अशा पाणी पिण्याच्या सवयीमध्ये. हार्दिक आपल्या दिवसाची सुरुवात अर्धा लिटर पाणी पिऊन करतो, जे त्याच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास आणि मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करते. फक्त पाणीच नाही, तर डाएट आणि वर्कआऊटचा समतोल राखत त्याने स्वतःला अत्यंत फिट ठेवले आहे.
ऐन चाळिशीतही येऊ शकतो हार्ट ॲटॅक, नकळत होणाऱ्या ५ चुका आजच बदला-नाहीतर वेळ निघून जायची...
हार्दिक पंड्या सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी भरपूर प्रमाणात पाणी पितो. सकाळी डोळे उघडल्या-उघडल्या तो अर्धा लिटर पाणी घटाघटा पितो. ही त्याची दिवसातील सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची चांगली सवय आहे. रात्रभर झोपल्यामुळे शरीर डिहायड्रेट होते, म्हणूनच सकाळी सर्वात आधी पाणी प्यायल्याने संपूर्ण शरीर ॲक्टिव्ह होते, मेटाबॉलिझमचा वेग वाढतो आणि दिवसभर एनर्जी टिकून राहते. हार्दिक उठल्याबरोबर ५०० मिली पाणी पितो आणि त्यानंतर योग किंवा ध्यान करतो.
काय आहे त्याचे 'कम्फर्ट फूड'?
हार्दिक पंड्याची पीळदार शरीरयष्टी पाहून कोणालाही असे वाटेल की, तो फक्त स्मूदी, ज्यूस आणि डाएट फूड यांसारखे पदार्थच खात असेल, पण खरंतर... नूडल्स हे हार्दिकचे 'अल्टीमेट कम्फर्ट फूड' आहे. हार्दिक सांगतो की, त्याच्या संघर्ष काळात जेव्हा पैसे कमी असायचे, तेव्हा ट्रेनिंगनंतर थकून घरी आल्यावर तो फक्त नूडल्स तयार करुन खायचा. आजही जेव्हा मन थकलेले असते, प्रेशर जास्त असते किंवा जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा असतो, तेव्हा हार्दिक कधीकधी मोठ्या आवडीने नूडल्स खातो. त्याने स्वतः एका मुलाखतीत म्हटले आहे की, " माझ्या संघर्षाच्या दिवसात नूडल्स माझा सर्वात आवडता पदार्थ होता."
जाडजूड मांड्या-पोटाचा घेर कमी करतो शेवग्याच्या पानांचा उपाय, वेटलॉससाठी शेवगा असरदार...
खाण्या - पिण्याच्या सवयीत असा केला बदल...
हार्दिक पंड्याने आपल्या आहाराबाबत अत्यंत कडक शिस्त पाळली आहे. त्याच्या आहारात ९०% शाकाहारी किंवा प्लांट-बेस्ड अन्न - पदार्थांचा समावेश असतो. यामध्ये हाय-प्रोटीन स्मूदी, तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात वाफवलेले किंवा उकडलेले पदार्थ तो मोठ्या आवडीने खातो. जरी तो डाएट आणि फिटनेसच्या संदर्भात अतिशय काटेकोर असला, तरी 'चीट डे'ला तो पावभाजी, पाणीपुरी आणि चॉकलेट ब्राऊनी खाण्याचा मनसोक्त आनंद घेतो. मात्र, मॅगी ही त्याच्या संघर्षाच्या काळातील जुन्या आठवणींशी जोडलेली असल्याने, तो आजही कधीकधी त्याचा आस्वाद घेतो.
