Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ऐन चाळिशीतही येऊ शकतो हार्ट ॲटॅक, नकळत होणाऱ्या ५ चुका आजच बदला-नाहीतर वेळ निघून जायची...

ऐन चाळिशीतही येऊ शकतो हार्ट ॲटॅक, नकळत होणाऱ्या ५ चुका आजच बदला-नाहीतर वेळ निघून जायची...

habits that damage your heart before age of 40 : cardiologist explains heart attack causes : habits increasing heart attack risk : कमी वयात हार्ट ॲटॅक टाळायचा असेल तर आजच सोडा ५ वाईट सवयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2026 16:16 IST2026-05-11T15:55:31+5:302026-05-11T16:16:04+5:30

habits that damage your heart before age of 40 : cardiologist explains heart attack causes : habits increasing heart attack risk : कमी वयात हार्ट ॲटॅक टाळायचा असेल तर आजच सोडा ५ वाईट सवयी...

habits increasing heart attack risk habits that damage your heart before age of 40 | ऐन चाळिशीतही येऊ शकतो हार्ट ॲटॅक, नकळत होणाऱ्या ५ चुका आजच बदला-नाहीतर वेळ निघून जायची...

ऐन चाळिशीतही येऊ शकतो हार्ट ॲटॅक, नकळत होणाऱ्या ५ चुका आजच बदला-नाहीतर वेळ निघून जायची...

आजकाल अगदी कमी वयात हार्ट ॲटॅक येण्याच्या घटना झपाट्याने वाढताना दिसत आहेत. पूर्वी वाढत्या वयाशी जोडला जाणारा हा गंभीर आजार आता तरुणांनाही मोठ्या प्रमाणात त्रास देत आहे. सततचा ताण, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव आणि धूम्रपान यांसारख्या रोजच्या लाईफस्टाईलमधील काही सवयी हळूहळू हृदयावर वाईट परिणाम करत असतात. अनेकदा शरीर आधीच काही संकेत देत असते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे हार्ट ॲटॅकचा धोका अधिक वाढू शकतो(habits that damage your heart before age of 40).

पूर्वी वृद्धपकाळात ऐकू येणारा 'हार्ट ॲटॅक' हा शब्द आता विशी-तिशीतील तरुणांच्या बाबतीतही सर्रास ऐकायला मिळत आहे. फिट दिसणारे तरुण अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने कोसळत आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. खरं तर, हृदयविकार हा केवळ अनुवांशिक नसून आपल्या लाईफस्टाईलमधील चुकीच्या सवयींचा तो एक परिणाम आहे. नकळतपणे आपण रोजच्या जीवनात अशा काही गोष्टी करतो, ज्या आपल्या हृदयाला आतून कमकुवत (cardiologist explains heart attack causes) बनवत आहेत. जर आपल्यालाही हृदयविकाराचा धोका टाळून दीर्घायुषी व्हायचे असेल, तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे. जर कमी वयात हृदयविकारांपासून दूर राहायचे असेल, तर काही चुकीच्या (habits increasing heart attack risk) सवयी वेळेत सोडणे अत्यंत गरजेचे आहे. जाणून घेऊया अशा ५ सवयींबद्दल, ज्या हार्ट ॲटॅकचा धोका वाढवू शकतात.

कमी वयातच हार्ट ॲटॅक येऊ नये म्हणून नेमकं काय करावं ? 

१. सकाळचा नाश्ता न करणे :- सकाळी कामाच्या किंवा ऑफिसला जाण्याच्या घाई गडबडीत अनेकदा आपण सकाळचा नाश्ता करत नाही. नाश्ता आपल्या  शरीराला दिवसभर ऊर्जा देण्याचे काम करतो. नाश्ता केल्यामुळे स्ट्रेस वाढत नाही, शरीरातील 'कोर्टिसोल' (Cortisol) हार्मोन नियंत्रणात राहते आणि रक्तातील साखर देखील संतुलित राहते. जर तुम्ही नाश्ता करणं सोडल, तर या सर्व गोष्टींची पातळी बिघडते, जे आपल्या हृदयासाठी घातक ठरू शकते. सकाळच्या  नाश्त्यात आपण पराठा, पोळी, ओट्स किंवा अंडे यांसारखे पदार्थ खाऊ शकता, पण नाश्ता करणं कधीही टाळू नका.  

जाडजूड मांड्या-पोटाचा घेर कमी करतो शेवग्याच्या पानांचा उपाय, वेटलॉससाठी शेवगा असरदार...

२. व्यायाम न करणे :- सकाळी उठल्या उठल्या तासंतास फोन वापरणे, त्यानंतर ऑफिसला जाऊन ८ ते ९ तास खुर्चीवर बसून राहणे आणि घरी आल्यावर पुन्हा बेडवर पडून फोन बघणे, अशी सवय आजकाल बहुतेकांना लागली आहे. ही सवय आपल्या हृदयासाठी अत्यंत धोकादायक आहे. हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे, तरच हृदयाचे स्नायू मजबूत होतात. जर तुम्हाला जिममध्ये जाणे शक्य नसेल, तर किमान अर्धा तास चाला किंवा घरीच योगासने करा.

जपानी लोकांच्या ५ सवयी वाढवतात आयुष्य-हार्ट ॲटॅकही टळतो, ठरवलं तर आपल्यालाही जमेल सहज...

३. झोप कमी आणि स्ट्रेस जास्त असणे :- किमान ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेणं आपल्या शरीरासाठी आवश्यक असते, परंतु आता हे प्रमाण कमी होऊन ६ तासांवर आले आहे. जरी तुम्ही किमान ६ तास शांत झोप घेऊ शकलात, तरी ते हृदयासाठी चांगले असते. ६ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास तुमचे हृदय कमकुवत होऊ लागते. पुरेशी झोप न मिळाल्यास मेंदूवरचा ताण वाढतो आणि पर्यायाने स्ट्रेस लेव्हल (Stress level) देखील वाढत जाते. याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर होतो आणि हार्ट ॲटॅकचा धोका वाढतो.

४. प्रोसेस्ड फूड्स :- आजकाल प्रोसेस्ड फूड खाण्याचा ट्रेंड खूपच वाढला आहे - पॅकेटमधील पॅकबंद केलेलं पदार्थ आणा आणि खा. याशिवाय आपण  ऑनलाईन ऑर्डर करून अन्नपदार्थ मागवतात, परंतु या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम असते, जे रक्तदाब (Blood Pressure) वाढवते. वाढलेला बीपी (BP) हृदयासाठी 'सायलेंट किलर' ठरतो, ज्यामुळे हार्ट ॲटॅकचा धोका अधिक वाढतो.

५. धूम्रपान आणि मद्यपान :-जर आपण मोठ्या प्रमाणात सिगारेट आणि दारू पीत असाल, तर आपले हृदय हळूहळू कमकुवत होत जाते. आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये  कित्येकजणांनी सिगारेट आणि दारूला अविभाज्य भाग बनवले आहे, परंतु या दोन्ही गोष्टी केवळ हार्ट ॲटॅकला आमंत्रण देत नाहीत, तर यामुळे अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोकाही निर्माण होतो.

मग नेमकी काळजी कशी घ्यावी ? 

१. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावे.

२. अर्धा तास चालावे किंवा व्यायाम करावा.

३. नाश्त्यामध्ये सकस आहार घ्यावा, ज्यामध्ये प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात असतील.

४. ऑफिसमध्ये सतत बसून राहू नका, मधून-मधून उठा आणि थोडे चाला.

५. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात हेल्दी पर्यायांची निवड करा आणि बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.

६. दारू आणि सिगारेटचे प्रमाण मर्यादित करा किंवा पूर्णपणे टाळा. चहा-कॉफी देखील योग्य प्रमाणातच प्यावी. 

७. कमीत कमी ६ ते ७ तास झोप घ्या, यापेक्षा कमी झोप घेणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.

Web Title : 40 की उम्र में भी हार्ट अटैक का खतरा? इन आदतों को बदलें!

Web Summary : युवा वयस्कों में हार्ट अटैक तेजी से बढ़ रहा है। तनाव, खराब खानपान, व्यायाम की कमी और धूम्रपान जैसे जीवनशैली कारक योगदान करते हैं। नाश्ता करना, व्यायाम करना, पर्याप्त नींद लेना, प्रोसेस्ड फूड से बचना और शराब व धूम्रपान सीमित करना जोखिम कम कर सकता है।

Web Title : Heart attack risk in your 40s? Change these habits now!

Web Summary : Heart attacks are increasingly common in younger adults. Lifestyle factors like stress, poor diet, lack of exercise, and smoking contribute. Simple changes like eating breakfast, exercising, getting enough sleep, avoiding processed foods, and limiting alcohol and smoking can significantly reduce risk.