प्रतीक बब्बरने दाखवला आई स्मिता पाटील यांचा Unseen फोटो, म्हणतो- "आईकडून मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 15:51 IST2026-05-14T15:48:13+5:302026-05-14T15:51:12+5:30
अभिनेता प्रतीक बब्बर याने अलीकडेच आपली आई, दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासोबतचा एक जुना फोटो आणि स्वतःचा एक फोटो कोलोज करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे

प्रतीक बब्बरने दाखवला आई स्मिता पाटील यांचा Unseen फोटो, म्हणतो- "आईकडून मला..."
अभिनेता प्रतीक बब्बर याने अलीकडेच आपली आई, दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासोबतचा एक जुना फोटो आणि स्वतःचा एक फोटो कोलोज करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंमध्ये स्मिता पाटील यांचा ग्लॅमरस अंदाज आणि प्रतीकचा खास लूक पाहायला मिळत आहे. प्रतीकने हा फोटो शेअर केल्याने स्मिता पाटील यांचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज दिसून येतोय.
प्रतीकने हा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "मला हे सर्व माझ्या आईकडूनच मिळाले आहे". प्रतीक सोशल मीडियावर कायमच आई स्मिता पाटील यांची आठवण जागवताना दिसतो. याशिवाय आईसारखीच पोज देताना दिसतो.
प्रतीक हा राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. २८ नोव्हेंबर १९८६ रोजी प्रतीकचा जन्म झाला, मात्र प्रेग्नंसीमधील समस्यांमुळे दुर्दैवाने स्मिता पाटील यांचे निधन झाले. प्रतीक अनेकदा आपल्या आईच्या आठवणीत सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असतो.
लग्न आणि वादावर स्पष्टीकरण
प्रतीकने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला लग्न केले, मात्र या लग्नाला त्याचे वडील राज बब्बर किंवा कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित नव्हते. या वादाबद्दल बोलताना प्रतीकने एका मुलाखतीत सांगितले की, "लोकांना अजून पूर्ण सत्य माहीत नाही. एकेदिवशी हे सत्य पुस्तक, मुलाखत किंवा चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर येईल".
वडीलांचे आडनाव सोडण्याचा निर्णय
या सर्व वादांच्या पार्श्वभूमीवर प्रतीकने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आपल्या वडीलांचे (राज बब्बर) आडनाव सोडून आता केवळ आपल्या आईचे नाव आणि तिचा वारसा पुढे नेण्याचे ठरवले आहे. त्याने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, "मला पूर्णपणे माझ्या आईसोबत जोडले जायचे आहे. मला माझ्या आईसारखे बनायचे आहे, वडीलांसारखे नाही. हा माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आहे".